ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल तृतीया. पराभवनाम संवत्सर.
नक्षत्र – चित्रा / दुपारी १.५५ नंतर स्वाती.
राशी – तुळ.
“आज आनंदी दिवस आहे.”
आज *हरितालिका, श्री. गणेश चतुर्थी*.
रवी लाभ मंगल, चंद्र युती शुक्र, बुध त्रिकोण हर्षल.
१४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला चांगले असून अत्यंतलोकप्रिय आहात. तुम्ही इराण सहसा दुखावत नाहीत. कमी बोलणे तुम्हाला हिताचे वाटते. तुम्ही सहसा स्वतःची गुपिते इतरांना सांगत नाहीत. तुमची निरीक्षण शक्ती उत्तम आहे. तुम्हालाकोडी सोडवणे, लॉटरी, शेअर्स यांचा नाद असतो. लहान वयात एखादे प्रेमप्रकरण संभवते. तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा टवू शकतात. व्यावसायिक यश चांगले मिळते.गूढ विद्याची तुम्हाला आवड असते मात्र त्यासाठी अभ्यासाचे कष्ट घेण्याची तयारी नसते. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतरभाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते. स्त्रियांना प्रसूतीबाबत काही अडचणी येऊ शकतात
व्यवसाय:- वकील, मेडिकल, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
गणपती स्थापना शुभ मुहूर्त
सकाळी
९:१० ते १०:४३
नंतर
दुपारी ३:२२ ते ४:५५
सौ मधुरा पंचाक्षरी
नाशिक
राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)
मेष:- अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ:– दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन:– आनंददायी दिवस आहे. मनाप्रमाणे काही घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामात उत्साह राहील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. मात्र कौटुंबिक बाबतीत संयम ठेवावा.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या:- दिवस चांगला आहे. आर्थिक व्यवहारात फायदा होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. एखादा आनंददायी अनुभव येऊ शकतो.
तुळ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.
वृश्चिक:- अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. कामात प्रगती होईल. मात्र खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
धनु:- लाभदायक दिवस आहे. नवीन ओळखी होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील.
मकर:- दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील एखादी शुभवार्ता आनंद देईल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
मीन:- अनुकूल दिवस आहे. मोठी कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल आणि धाडसी निर्णय घेण्याची उमेद राहील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)




