आजचे राशिभविष्य शनिवार,१९ सप्टेंबर २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल अष्टमी / दुपारी ३.२७ नंतर नवमी.
वर्षा ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र – मूळ. राशी – धनु.
*दुर्गाष्टमी. गौरी विसर्जन* दिवसभर. दोरे घेणे.
चंद्र लाभ शुक्र, चंद्र केंद्र नेपच्यून.

१९ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये,(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचाजन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुमच्यात एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात अडथळे येऊ शकतात. मात्र तुम्हाला संशोधन करण्याची आवड असते. तुमचं स्वभाव तापट आणि हेक्त असू शकतो. स्वभाव उतावळा असल्याने प्रेमप्रकरणात अपयश येऊ शकते. तुम्हा अधिकार आणि प्रतिष्ठा मिळतात. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभयसू असतात. तुमचा स्वभाव धडपड्या, बढाईखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग प्रतिसाद मिळत नाही. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी याची हाव टाळली पाहिजे.

व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, स्टुडिओ मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, बँकिंग, औषध, वैद्यकीय क्षेत्र, वकील.

शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.

शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

राशिभविष्य

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. खरेदीचा योग आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस चांगला आहे. प्रवास घडतील. कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीकडून सहकार्य मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. नोकरी-व्यवसायात चांगले अनुभव येतील. सरकारी कामांना गती मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. वाहनसौख्य लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आनंददायी दिवस आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळण्याचा योग आहे.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवस चांगला आहे. अर्थप्राप्ती होईल. व्यवसायात यश मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यातून लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. चांगल्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!