मुलांना धाकाने नाही, संवादाने जिंका!पालकत्व समुपदेशनातून नात्यांना नवी दिशा
काउन्सिलर- मीनाक्षी जगदाळे

(Child Psychology)सातत्याने वाढत चाललेली पालक आणि पाल्य यांच्यातील जनरेशन गॅप, मतभेद, तणाव, मुलांच्या आत्महत्या हेच दर्शवतात की आता पहिल्यासारखं मुलांना धाकात ठेवून, शिस्त लावून, शिक्षा करून मुलं आपल्या मनाप्रमाणे वागणार नाहीयेत. आताची पिढी आयुष्याकडे, समाजाकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहणारी आणि प्रॅक्टिकल, लॉजिकलं आयुष्य जगण्यावर भर देणारी आहे.
भविष्यात येवू घातलेल्या पिढी सोबत जर अतूट नातं टिकवायचं असेल तर पालकांना त्यांच्या मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या भावनिक, वर्तवणूकविषयक आणि मानसिक आव्हानांवर मात करण्यासाठी अनेकअंगाने विचार करणे अपेक्षित आहे.
या लेखमार्फत आपण अश्या विविध मानसशास्त्र आधारित थेरपींचा (Therapies) वापर समजावून घेणार आहोत ज्यामुळे पालकांना येणाऱ्या अडचणी कमी होवू शकतात. समुपदेशन दरम्यान मुलाचे वय, कुटुंबातील सदस्य, त्यांची पार्शवभूमी, घरातले वातावरण आणि समस्येचे स्वरूप लक्षात घेवून थेरपींचा वापर केला जातो.
पहिले जाणून घेवू
*पालक-बाल परस्परसंवाद थेरपी*(Parent-Child Interaction Therapy – PCIT)
ही थेरपी प्रामुख्याने २ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. यामध्ये पालकांना मुलांशी थेट संवाद साधताना live गाइड केले जाते . थेरपिस्ट एका काचेमागून किंवा कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण करतो आणि पालकांच्या कानात असलेल्या उपकरणाद्वारे (Earpiece) त्यांना तात्काळ सूचना देतो. या थेरपी चा फायदा मुलांमधील हट्टीपणा, आक्रमकता आणि पालकांमधील राग नियंत्रित करून त्यांच्यातील भावनिक नाते मजबूत करण्यासाठी होतो. अनेकदा लहान मुलांच्या बाबतीत पालक फक्त तोंडी ज्या तक्रारी सांगतात त्यावरून निष्कर्ष काढणे योग्य नसते अश्या वेळी हि समक्ष निरीक्षण केलेली थेरपी प्रभावी ठरते.
*कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी* (Cognitive Behavioral Therapy – CBT)
याद्वारे पालकांच्या विचारसरणीत (Thoughts) सुधारणा करून त्यांच्या वर्तनात (Behavior) सकारात्मक बदल घडवून आणला जातो. मुले हट्ट करतात किंवा ऐकत नाहीत तेव्हा पालकांच्या मनात येणारे नकारात्मक विचार ओळखले जातात आणि त्यांना सकारात्मक व वास्तववादी विचारांमध्ये बदलण्यास शिकवले जाते. पालकांचा ताण कमी होतो आणि मुलांच्या चुकांवर ओरडण्याऐवजी शांतपणे मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होते. प्रथम आपल्या मुलाचा स्वभाव, गुण – अवगुण, मर्यादा, कमतरता पालकांनी स्वीकारने आवश्यक आहे. आपलं मुलं आपल्याला पूर्ण समजलं की त्यानुसार आपण आपल्या अपेक्षा ठरवू शकतो.
*पॉझिटिव्ह पेरेंटिंग प्रोग्राम* (Triple P – Positive Parenting Program)
हे एक पुराव्यावर आधारित (Evidence-based) जागतिक स्तरावर वापरले जाणारे मॉडेल आहे. शिक्षा करणे किंवा मारहाण करणे याऐवजी मुलांच्या चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देणे (Positive Reinforcement) आणि योग्य सीमा (Boundaries) ठरवून देणे यावर यात भर दिला जातो. मुलांमध्ये स्व-शिस्त (Self-discipline) निर्माण होते आणि पालकांना रोजच्या संगोपनात येणारा मानसिक ताण कमी होतो.मुलांना शिक्षा करून, त्यांच्याशी अबोला धरून नात्यात अधिक तणाव निर्माण होतो, मुलं अधिक हट्टी, बेरड, हेकट होण्याची शक्यता वाढते. मुलांना काही नियम, शिस्त आणि मर्यादा एकदाच ठरवून दिल्यास पालक समाधानी होतात.
*ॲटॅचमेंट-बेस्ड फॅमिली थेरपी* (Attachment-Based Family Therapy – ABFT)
पालक आणि मुलांमधील भावनिक नाते (Emotional Bond) आणि विश्वास पुनरुज्जीवित करण्यासाठी या थेरपीचा वापर केला जातो.कौटुंबिक दुरावा, जुने मतभेद किंवा विश्वासाची कमतरता दूर करण्यासाठी पालक आणि मुलांसोबत स्वतंत्र व एकत्र सत्रे (Sessions) घेतली जातात.ही थेरपी विशेषतः किशोरवयीन मुलांशी (Teenagers) संवाद सुधारण्यासाठी आणि त्यांच्यातील नैराश्य किंवा बंडखोर वृत्ती हाताळण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. अनेक घरामध्ये, मोठया कुटुंबात जिथे जास्त लोकं एकत्र राहतात तिथे प्रत्येकाला स्वतःचे वेगळे विचार आणि मत असते. मुलांच्या कानावर बहुतांश वेळा आपल्या पालकांबद्दल चुकीची माहिती आलेली असते त्यामुळे हि मुलं बंडखोर होण्याची शक्यता असते. नौकरी व्यवसाय यामुळे मुलांना वेळ देवू न शकल्यामुळे त्यांच्यातील दुरावा पण या थेरपी मुळे घालवता येतो.
*ॲसेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी* (Acceptance and Commitment Therapy – ACT)
पालकत्वातील आव्हानांचा स्वीकार करून आपल्या मूल्यांनुसार मुलांचे संगोपन करण्यास ही थेरपी मदत करते. पालकांना हे समजवले जाते की पालकत्व नेहमीच परिपूर्ण (Perfect) असू शकत नाही. नकारात्मक भावनांशी न भांडता, माइंडफुलनेसच्या (Mindfulness) साहाय्याने परिस्थिती स्वीकारणे आणि योग्य निर्णयांवर कटिबद्ध राहणे शिकवले जाते.पालकांमधील चिंता (Anxiety) आणि अपराधीपणाची भावना (Guilt Complex) कमी होते. मुलं चुकीची वागली की पालक स्वतःला दोष देतांना दिसतात. या थेरपी मुळे पालक एकंदरीत परिस्थिती सकारात्मक पद्धतीने हाताळू शकतात.
*सिस्टेमिक फॅमिली थेरपी* (Systemic Family Therapy)
या थेरपीमध्ये केवळ एका मुलाला किंवा पालकाला केंद्रस्थानी न ठेवता संपूर्ण कुटुंबाला एक प्रणाली (System) मानले जाते.कुटुंबातील सर्व सदस्यांची संवादाची पद्धत, एकमेकांवरील प्रभाव आणि कौटुंबिक वातावरण या सर्वांचा अभ्यास करून समस्या सोडवली जाते.कौटुंबिक वाद मिटवून संपूर्ण घरातील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. अनेक मोठया कुटुंबात मुलांना होणारा मानसिक भावनिक त्रास हा फक्त पालकांकडून नसतो तर तो घरात राहणारे इतर नातेवाईक यांच्या कडून सुद्धा असतो, यातील प्रत्येकजण मुलांना कशी वागणूक देतो यावर मुलांची मानसिकता ठरत असते.
आता आपण जाणून घेवू की समुपदेशन करतांना थेरपीची निवड कशी केली जाते.(Child Psychology)
लहान मुलांसाठी (२ ते १० वर्षे) PCIT आणि Triple P थेरपीचा जास्त वापर होतो.किशोरवयीन मुलांसाठी (११ ते १८ वर्षे) ABFT आणि CBT थेरपी अधिक उपयुक्त ठरतात. पालकांच्या स्वतःच्या मानसिक ताणासाठी CBT आणि ACT या थेरपींचा प्राधान्याने वापर केला जातो. सर्वप्रथम पालकांनी समुपदेशन यांना आपल्या पाल्या बाबतीत, आपल्या बाबतीत आणि कुटुंबातील सदस्य, पार्शवभूमी याबद्दल सविस्तर सांगितले की त्यानुसार नियोजन केले जाते.
हॅपी लाईफ काउनसेलिंग सर्विसेस, नाशिक
काउन्सिलर- मीनाक्षी जगदाळे
9766863443