
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल पंचमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र – पूर्वाषाढा / रात्री ८.२५ नंतर उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
योग – शूल योग.
ग्रहयोग – रवी लाभ चंद्र, चंद्र केंद्र शुक्र.
कड पंचमी, पांडव पंचमी.
आज कड पंचमी आणि पांडव पंचमी आहे. रवी लाभ चंद्र योगामुळे आत्मविश्वास, उत्साह आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. चंद्र केंद्र शुक्र योगामुळे कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत काही संमिश्र अनुभव येऊ शकतात. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. शूल योगामुळे महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता असल्याने निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक व्यवहारात योग्य नियोजन केल्यास दिवस समाधानकारक जाईल.
राशिभविष्य(Marathi Rashi Bhavishya)
मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) भाग्याची उत्तम साथ लाभेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अचानक खर्च उद्भवू शकतात. मालमत्तेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी होतील. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.
मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) भागीदारीच्या व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. बौद्धिक आणि कलात्मक कामात विशेष यश मिळेल. प्रेमसंबंधात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत.
कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल.
तूळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. रवी लाभ चंद्र योगामुळे महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. मात्र, चंद्र केंद्र शुक्र योगामुळे कौटुंबिक बाबतीत काही मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक व्यवहारात योग्य नियोजन करा.
कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
