आजचे राशिभविष्य शुक्रवार १५ ऑक्टोबर २०२१

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, शुक्ल, दशमी, दक्षिणायन, शरद ऋतू, शुक्रवार,
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्रनक्षत्र श्रवण (सकाळी ९.१६ पर्यंत) चंद्र राशी मकर
आज शुभ दिवस, विजया दशमी (दसरा) आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- स्वप्नरंजन करण्यात मन रमेल. कामात उत्साह जाणवेल. आनंदी अनुभव येतील.
वृषभ:- तीर्थयात्रा घडेल. आप्त भेटतील. प्रवासात समाधानकारक अनुभव येतील.
मिथुन:- मानसिक क्लेश जाणवतील. शक्यतो आराम करणे हिताचे आहे. अन्यथा धावपळ वाढू शकते.
कर्क:-  प्रेमी जनांना खुशखबर मिळेल. आनंदी वातावरण राहील. नवीन ओळखी होतील.
सिंह:- पोटाचे विकार संभवतात. काळजी घ्या. कोणत्याही अतिरेक नको. आर्थिक लाभ होतील.
कन्या:- शेजाऱ्यांशी सुसंवाद साधा. गूढ विद्यांचा अनुभव येईल. फारसे कामकाज होणार नाही.
तुळ:- घराजवळील व्यक्तींचा काहीसा त्रास जाणवेल. संयम आणि शांतता आवश्यक आहे. मौल्यवान खरेदी होईल.
वृश्चिक:- आप्त भेटतील. विचार प्रवर्तक चर्चा होईल. मार्ग मोकळे होतील. वेगळे वळण लाभेल.
धनु:- हट्टाग्रही भूमिका टाळणे हिताचे आहे. विशेषतः नात्यात कटुता येऊ देऊ नका. शब्द जपून वापरा.
मकर:- मेजवानीच योग आहेत. आनंदी राहाल. प्रसन्न दिवस आहे.
कुंभ:- त्रागा करून घेणे टाळा. मनासारख्या घटना घडल्या नाहीत तरी हरकत नाही. लवकरच परिस्थिती बदलेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
मीन:- आनंद आणि उत्साह यांचा सुरेख मेळ आहे. शुभ समाचार समजतील. नवीन सुरुवात कराल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.