मुंबई- उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली असून संपूर्ण राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे,विदर्भातही थंडीची लाट असून थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.आज म्हणजेच मंगळवारी राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे ५.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झालीय. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यातच आज ही निच्चांकी तापमानाची नोंद झालीय.थंडीच्या कडाक्यामुळे धुळेकर चांगलेच गारठल्याचे बघावयास मिळत आहे.
येत्या ४८ तास धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रात असाच थंडीचा कडाका राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला आहे. २२ डिसेंबरपासून राज्यात सर्वच ठिकाणी तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत थंडीचा कडाका जास्त जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान
परभणी- 7.6°c
जळगाव 7.0°c
चिकलठाणा औरंगाबाद 10.4°c
जालना 10.0°c
बारामती 11.1°c
पुणे 11.3°c
उस्मानाबाद 12.0°c
नाशिक 10.8°c
परभणी 10.0°c
अहमदनगर 9.8°c
सोलापूर 10.8°c
नांदेड 11.0°c
मालेगाव 11.4°c
सातारा 13.1°c