नाशकात रंगणार ‘भिमसेन शतसंवत्सर संगीत महोत्सव’

डॉ.अविराज तायडे व पं.विजय कोपरकर यांचे गायन

0

नाशिक – भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त नाशिक शहरातीत संगीत प्रेमींच्या वतीने ‘ भिमसेन शतसंवत्सर प्रसंग ‘ या समारोहाचे आयोजन उद्या दि. ४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता  कालीदास कला मंदिर येथे  होणार असून कोरोनाचे सर्व नियम पाळून या कार्यक्रमाचा रसिकांना आनंद घेता येईल .हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.

कार्यक्रमात पंडित भिमसेन जोशी यांच्यावर जिवनावर आधारीत फिल्म तसेच ,डॉ .अविराज तायडे यांचे व पं . विजय कोपरकर यांचे गायन आयोजित करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला राजयोगिनी ब्रहमाकुमारी वासंती दिदीजी, मा . श्रीमती वत्सलाताई अर्जुन खैरे , नगरसेवक गुरमितसींग बग्गा , मा . छायाताई दिलीप देवांग व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची साथसंगत प्रसिद्ध तबलावादक पं . मुकुंदराज देव पं . नितिन वारे , दिगंबर सोनवणे , अमित भालेराव , कु . इश्वरी दसककर , करणार असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निरुपणकार स्वानंद बेदरकर करणार आहे . या कार्यक्रमा करीता सर्वांनी उपस्थित राहून संगीताचा आनंद घेण्याचे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!