मुंबई – “मी घेऊन येतोय महिलांसाठी खास राखीव बस”, असं सुबोध भावेने म्हणताच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली ती म्हणजे बस बाई बस या कार्यक्रमाची. या बसमध्ये चढणारं पहिलं सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रिया सुळे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात सुप्रिया सुळे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सुबोध भावे आणि त्याचसोबत कार्यक्रमातील महिला मंडळ सुप्रिया सुळेंचा जीवन प्रवास उलगडणार आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारणार आहेत.
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जाणून घेताना एक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल ते म्हणजे सुप्रिया सुळे या खूप चांगलं गुजराती देखील बोलतात. या भागात काही राजकारण्यांचे फोटो दाखवून सुप्रिया ताईंना त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगितलं असताना मोदींजींच्या फोटो सोबत त्यांनी चक्क गुजरातीमध्ये संवाद साधला. त्यांना अस्खलित गुजराती बोलता येतं हि गोष्ट कदाचित खूपच कमी लोकांना माहित असावी. अशाच प्रकारे सुप्रिया ताईंबद्दल अजून गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका बस बाई बस शुक्रवार २९ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.
[…] मुंबई, दि. ३ मे २०२५:- PSI Arjun Marathi Movie मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच एका ट्रेलर लाँच सोहळ्याने चांगलीच चर्चा गाजवली आहे. अंकुश चौधरी अभिनित ‘पी.एस.आय. अर्जुन’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर जेलच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलीस स्टेशनच्या रिक्रिएटेड सेटवर प्रदर्शित करण्यात आला. हा सोहळा इतक्या वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आल्याने चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. […]