भुजबळांचे आयुक्तांना आवाहन : शहरातील उड्डाणपूलाखालील सौंदर्य अबाधीत ठेवा

मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाणपूलाखाली संसार थाटलेल्या फुल विक्रेत्यांसह अनधिकृत व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्था करा

0

नाशिक, दि.२९ ऑगस्ट २०२२- नाशिक शहरातील मुंबईनाका ते द्वारका परिसरात उड्डाणपूलाखाली फुल व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या पथविक्रेत्यांनी आपला संसारच याठिकाणी थाटला असून शहरातील मध्यवर्ती भागात अतिशय विदारक दृश्य बघावयास मिळत आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून या अनधिकृत व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्था करून उड्डाणपूला खालील सौंदर्य अबाधित ठेवा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मनपा आयुक्त,पोलीस आयुक्त व महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शहराचे अधिक सौंदर्य अधिक वाढावे यासाठी उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला फुलझाडे लावण्यात आलेली आहे. मात्र मुंबई नाका ते द्वारका परिसरात फुल व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी थेट या उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूस संसार थाटला आहे. याठिकाणी लावण्यात आलेली फुल झाडे देखील त्यांनी तोडून टाकली असून अतिशय विदारक असे दृश्य पहावयास मिळत आहे.

Bhujbal's appeal to the Commissioner: Keep the beauty under the flyover in the city intact

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत आज नाशिकचे मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत या विदारक दृष्याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तसेच तातडीने या अनधिकृत व्यावसायिकांना हटविण्याच्या सूचना केल्या.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शहरात मोठ्या प्रमाणात  पर्यटक येतात ते उड्डाणपूल परिसरातून प्रवास करतात. प्रवास करत असताना नाशिक शहरातील हे विदारक दृश्य पाहत आहे. यामुळे नाशिकच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष कसे करू शकते असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना करत तातडीने याठिकाणी साफसफाई करून या विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!