अमित कदम, नाशिक
आज २९ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस साजरा केला जातोय, ज्याला अनेकजण मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा शोध मानता. आज असे एकही क्षेत्र नाही जिथे इंटरनेटचा वापर केला जात नाही, इंटरनेट मुळे कोणतीही माहिती क्षणात उपलब्ध होते. इंटरनेट हा आजच्या काळात सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, मानवी जीवनातील सर्वात मोठी प्रगती म्हणजे इंटरनेट, इंटरनेट मुळे संपूर्ण जग जवळ आले आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण इंटरनेटचा वापर करतात, इंटरनेट मुळे अगदी एका क्षणात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात माहिती पोहोचणे शक्य झाले आहे.
त्यापूर्वी कित्येक वर्षे अमेरिकेत आणि काही युरोपियन देशांमध्येही त्यासंबंधीचं संशोधन जोमानं चाललेलं होतं. २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. म्हणूनच या २९ ऑक्टोबर तारखेला ‘जागतिक इंटरनेट दिवस’ मानलं जाते. १९६९ च्या २९ ऑक्टोबरला जो प्रसंग घडला, तो मोठा मनोरंजक आहे. १९६०च्या दशकात अमेरिकन सैन्याला इंटरनेटसारखी व्यवस्था गुप्त संदेश वहनासाठी हवी होती. त्यादृष्टीनं अमेरिकन संरक्षण खात्यानं एका संशोधन प्रकल्पाला मोठं अर्थसाह्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्या संशोधनाचे आव्हान सोपवलं होतं. या प्रकल्पांतर्गत एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठांमध्ये जोडण्यात आलेले होते. खरं तर त्या चार संगणकांचं ते जगातलं पहिलं इंटरनेट होतं. या चार संगणकांपैकी एक होता कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात, तर दुसरा होता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात. तिसरा आणि चौथा संगणक कॅलिफोर्निया सांता बार्बरा आणि उता विद्यापीठात बसविलेला होता. १९६९ चे ते संगणक अर्थातच आजच्यासारखे प्रगत नव्हते. मॉनिटर्स तर हिरव्यार्जद अक्षरांनी चमकणारे असत. कॅलिफोर्नियामध्ये चार्ली क्लिाने या विद्यार्थी संगणकप्रणाली निर्मात्याने एका संगणकावरुन दुसऱ्या संगणकाला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवला गेला.
पहिल्या वेळी पाठविलेल्या login या शब्दापैकी केवळ lo शब्द पोचल्यानंतर सिस्टिम फेल झाली. पुढील अक्षरे जाऊ शकली नसली, तरी दूरसंचार आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासामध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे. असा तो २९ ऑक्टोबर १९६९चा प्रसंग. अमेरिकन विद्यापीठं, त्यातील तरुण विद्यार्थी आणि अमेरिकन सैन्य एकमेकांना कशी पूरक ठरत होती, हाही त्यातून आपल्यासाठी निघणारा एक बोध. अशा प्रकारे ४७ वर्षांपूर्वी दोन तरुणांनी इंटरनेटवरचा पहिला संदेश पाठवला. तेव्हा २१ वर्षांचा असणारा चार्ली क्लाईन आता ६८ वर्षांचा आहे. मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्या आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं चार्ली आणि बिल गेल्या पिढीतले आहेत; पण त्या पिढीनं पुढल्या पिढीसाठी छड यशस्वी केल्यानंतरच हे शब्द आज सहजपणे जगभर फिरताहेत. संगणकांच्या छोट्या छोट्या गटांना जोडत जगभरामध्ये निर्माण झालेल्या जाळ्यालाच वर्ल्डवाईड वेब किंवा इंटरनेट असे म्हणतात. माहिती किंवा ज्ञानाच्या साठ्याला लोकांच्या मोठ्या गटापर्यंत पोचविण्याचे काम या जाळ्यामार्फत होत असते. आजवर ज्ञान ही केवळ काही लोकांचीच मक्तेदारी असल्याचे मानले जात होते. त्यामध्ये सार्वत्रिक शिक्षणासोबतच इंटरनेटच्या निर्मितीमुळे खऱ्या अर्थाने बदल घडला आहे. त्यामुळे या प्रणालीला खरीखुरी लोकशाही प्रणाली म्हणता येईल. सुरवातीच्या काळात इंटरनेट हे ARPAA (Advanced Research Projects Agency Aetwork) या नावाने ओळखले जात असे.
अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या चार जीवनावश्यक गोष्टींमधल्या कोणत्याही तीन निवडा, असा प्रश्न जर आजच्या तरुण पिढीला केला, तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनपैकी ते कोणता गाळतील, हे सांगणं अवघड आहे. एक नक्की, की कोणत्याही परिस्थितीत ते इंटरनेट वगळणार नाहीत. कारण त्यांचा प्रत्येक श्वा स आज प्राणवायूपेक्षा इंटरनेटच्या साह्यानं चालतो आहे. त्याची जीवनावश्यकता एव्हाना जगाने ओळखली आहे.
दुसऱ्या देशातील आपल्या नातेवाकांशी व्हिडीओ कॉलवरून संपर्क करता येतो, इंटरनेट च्या माध्यमातून जगभरात कामाच्या संधी निर्माण झाल्या आहेत, इंटरनेट मुळे नेट बँकिंग, ई – मेल, ऑनलाईन खरेदी, इ – कॉमर्स, यासारख्या गोष्टी साध्य साध्य झाल्या आहेत. ज्याचा मानवाच्या प्रगती साठी मोठा उपयोग झाला आहे, करमणुकीसाठी देखील इंटरनेट चा वापर केला जातो, विद्यार्थ्यांना तर ते एक वरदानच आहे. दिवाळी असो अथवा कुठला सण आता आपण शुभेच्छा देण्यासाठी माध्यम वापरतो ते माध्यम म्हणजे इंटरनेट.
तसेच इंटरनेट चे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. कोणत्याही गोष्टीचा जर दुरुपयोग झाला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्यामुळे इंटरनेट चा दुरुपयोग टाळायला हवा आहे, तसेच त्याचा आपल्या योग्य कामासाठी व मर्यादित उपयोग करायला हवाय. त्याचा उपयोग चांगली माहिती मिळवण्यासाठीच केला पाहिजे. याच इंटरनेट चा शोध लागला तो म्हणजे २९ ऑकटोबर १९६९ मध्ये आणि त्यावेळी हा फक्त दोन संगणकांमध्ये वापरला गेला आणि असं म्हणतात की २०१९ मध्ये याची वापराची संख्या ४. ५ दशलक्ष इतकी होती (४. ५ billion) म्हणजेच साधारणतः ५७ टक्के जगातील जनता इंटरनेट चा वापर करते, यातील बहुतांश वापर हा मोबाईल इंटरनेट द्वारा केला जातो, इंटरनेटवर अधिराज्य गाजवणारी गुगल हि सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाईट आहे, यानंतर यूट्यूब, व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल नेटवर्किंग साईट्सचा क्रमांक लागतो,
जगभरात कोरोनामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून बरेच लोक घरी बसून काम करत होते आणि आता ती घरून काम करण्याची पद्धतच उदयास आली आहे, नवीन व्यवसाय देखील आता इंटरनेटच्या माध्यमातून उदयास आले आहेत, अन्न, वस्र आणि निवारा यासोबत इंटरनेट हि देखील एक मूलभूत गरज बनली आहे. इंटरनेट चा सदुपयोग तसेच तितकाच दूरुपयोग देखील होत आहे म्हणजेच हि एक दुधारी तलवार आहे, सायबर फ्रॉड व सायबर क्राईम भारतात सध्या मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याविरुद्ध लढण्यासाठी भारता सारख्या देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
इंटरनेटचा वापर करताना साधारणतः काही गोष्टीचे कटाक्षाने आपण पालन केले तर यातील धोके आपण कमी करू शकतो, सार्वजनिक ठिकाणी मिळणारे मोफत इंटरनेट न वापरणे, अनोळखी व्यक्तीस घरातील इंटरनेट वापरास न देणे, वेळोवेळी आपल्या विविध सोशल नेटवर्किंग अकाऊंट्स चे तसेच नेट बँकिंग चे पासवर्ड बदलणे. त्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी इंटरनेट चा दुरुपयोग होऊ नये म्हणून फायरवॉल तसेच तत्सम अँटीव्हायरस सॉफ्टवेअर चा वापर करायला हवा आहे त्यामुळे सायबर हल्ले थांबवता येऊ शकतात, या इंटरनेट च्या च्या युगामध्ये आज सर्वात महत्त्वाचा काय असेल तर तो डेटा आपला डेटा जरी आपल्यासाठी कमी महत्त्वाचा असला तरी तो एखाद्या सायबर गुन्हेगारासाठी तो खजिना ठरू शकतो आहे, त्यामुळे आपला डेटा सुरक्षित ठेवण्यावर भर दिला पाहिजे.
एक दिवस असा येणार आहे, की संपूर्ण पृथ्वी ही मोफत वाय फायने युक्त असेल. एव्हरेस्टसारख्या एखाद्या उंच ठिकाणी कदाचित प्राणवायू मिळणार नाही; पण वाय फायचा सिग्नल खात्रीपूर्वक मिळताना दिसेल. आज ते अतिरंजित वाटले, तरी नजीकच्या भविष्यकाळात ते होणार, हे निश्चि्त आहे. आजची तरुण पिढी संपर्कासाठी इंटरनेटचा वापर अफाट करीत असते. व्हॉट्सअँपसारखं अँप्लिकेशन हे त्याचं उदाहरण. फेसबुकवर आज जितकी सुखदु:खं व्यक्त होतात, तेवढी समक्ष भेटीतही होत नाहीत, हे आजचं सत्य आहे.