पुण्यात भीषण अपघात : भरघाव ट्रकची तब्बल ४८ वाहनांना धडक 

0

पुणे,२० नोव्हेंबर २०२२ –  पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे.भरधाव ट्रकने ४८ वाहनांना धडक दिल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात १० जण जखमी झाल्याची माहिती  पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडून देण्यात  येत आहे.  या अपघातामुळे  नवले पुला वरील वाहतून विस्कळीत झाली आहे. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने नवले पुलावरील वाहनांना जोरदार धडक बसली आहे.

नवले पुलावर याआधीही अनेक वेळा भीषण अपघात झाले आहेत ज्या ज्यावेळी अपघात झाले आहेत,त्यावेळी प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करुनही यावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे या पुलावर वारंवार अपघात होत आहेत.सायंकाळी या पुलावर प्रचंड गर्दी असते.या गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.ट्रकने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकूण ४८ गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!