पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

पंतप्रधानांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

0

 

नागपूर,११ डिसेंबर २०२२ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आगमन झाले आहे.नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभही मोदींच्या हस्ते करण्यात आला . आज वंदे भारतला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर वंदे भारत ट्रेनचे बुकिंग सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे.

पंतप्रधान मोदी आज राज्याचा उपराजधानी असलेल्या नागपूर विमानतळावर  सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

Prime Minister Narendra Modi at Nagpur Airport

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नागपूर मेट्रो टप्पा १’चे लोकार्पण केले . फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास केला त्यावेळी मेट्रोमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला  पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा-२’ ची पायाभरणीही करणार आहेत.

त्यानंतर नरेंद्र मोदी नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करणार आहेत.त्यानंतर मिहान एम्सचे लोकार्पण केल्यानंतर  पंतप्रधानां च्या हस्ते वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास देखील करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!