Nashik : ” मीरा ” या हिंदी एकपात्री नाट्याविष्काराचे शनिवारी आयोजन

नर्तनरंग कथक नृत्य अकादमी तर्फे कालिदास कलामंदिरात आयोजन

0

नाशिक,१७ मार्च २०२३ – नर्तनरंग कथक नृत्य अकादमी तर्फे आज शनिवार, दिनांक १८ मार्च रोजी ” मीरा ” या हिंदी एकपात्री नाट्याविष्काराचे आयोजन करण्यात येत आहे. हा प्रयोग कालिदास कला मंदिरात सायंकाळी ५.३० वाजता सादर होणार आहे.

नाशिकच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि गुरू विद्या हरी देशपांडे यांनी लिहिलेल्या या प्रयोगाचे दिग्दर्शक ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांनी केले आहे. यामध्ये, संत मिराबाई यांच्या आयुष्यातील काही परिचित-अपरिचित घटनांचा सर्व समावेशक आविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे. संत मिराबाई लिखित काही भजनांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. हा प्रयोग स्वतः विद्या देशपांडे सादर करणार आहेत.

अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमीच्या संचालिका गुरू विद्या देशपांडे नेहमीच त्यांच्या प्रयोगशील उपक्रमांतून काहीतरी वेगळे आणि उपयुक्त देण्याचा प्रयत्न करत आलेल्या आहेत. सध्या, त्यांनी गुरुकुल उभारणीचा भव्य प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी काही कार्यक्रमांची मालिका त्या सादर करून, त्यातून काही रक्कम गुरुकुल साठी उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नर्तनरंग अकादमी ही,त्यांची ज्येष्ठ शिष्या प्रेषिता पंडित यांची उदयोन्मुख संस्था आहे. “मीरा “चा पहिला प्रयोग आयोजित करून,आपला हातभार गुरुकुल साठी लागावा हा नर्तनरंग चा मानस आहे. त्यामुळे, सगळ्या रसिकांनी आणि जाणकारांनी, मोठ्या संख्येने या प्रयोगाला उपस्थित राहावे असे आवाहन नर्तनरंग च्या संचालिका प्रेषिता पंडित यांनी केले आहे!!

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!