नाशिक,दि.१ मे २०२३ – बाबाज् थिएटरतर्फे आज (१ मे २०२३) ‘महाराष्ट्र दिन’ तसेच ‘कामगार दिन’ निमित्ताने तरुण संगीतप्रेमी तसेच जेष्ठ नागरिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. प्रशांत जुन्नरे यांची संकल्पना असलेला व महाराष्ट्राच्या लोकसंगीतावर आधारीत “महाराष्ट्र माझा” हा कार्यक्रम नाशिकमधील बुलंद आवाजाचे २१ गायक आपल्या सुरेल आवाजात सादर करणार आहेत.आज सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यमंदीर, नाशिक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. सुनिल धोपावकर (सांस्कृतिक), श्री. संजय रत्नपारखी (सांस्कृतिक) व कु. कल्याणी अनिता मनोहर (सामाजिक) या तीन मान्यवरांचा सत्कार डॉ. प्रमोद शिंदे, संचालक, कौशल्य हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम विनामूल्य असून सदर कार्यक्रमामध्ये संगीतकार व गायक संजय गीते, जितेंद्र देवरे, आनंद अत्रे, मिलींद धटींगण, संजय अडावदकर, डॉ. तुषार देवरे, अनिरुद्ध कुर्तडीकर, चेतन लोखंडू, ज्ञानेश्वर कासार, मंदार पगारे, विशाल दाते, संदिप थाटसिंगार, चेतन थाटसिंगार, राजु पवार, डॉ. प्रमोद शिंदे, अर्जुन तांबे, प्रसाद गोखले, विवेक केळकर, राजाभाऊ ढगे, सुरज बाजारी, अमोल पाळेकर असे एकूण २१ दिग्गज गायक आपली कला सादर करणार आहेत.
सदर कार्यक्रम वाद्यवृंद संयोजक अमोल पाळेकर सादर करणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे निवेदन संतोष फासाटे करणार असून सदर कार्यक्रमासाठी कौशल्य हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरचे डॉ. प्रमोद शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी सदर कार्यक्रमाचा सर्व जेष्ठ नागरीक व नाशिकमधील संगीतप्रेमी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबाज् थिएटरचे प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, एन.सी. देशपांडे, शामराव केदार, जे. पी. जाधव, दिलीपसिंह पाटील, प्रा. डॉ. प्रितीश कुलकर्णी यांनी केले आहे.