छंदोमयी ग्रुपतर्फे नाशिकमध्ये ६ आणि ७ मे ला भरणार अनोखे प्रदर्शन 

प्राचीन कुलूप,सूक्ष्म गणेश,धातू शिल्प, कापूस शिल्प बघायची नाशिककरांना संधी 

1

छंदोमयी ग्रुप आणि नासिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त उपक्रम 

नाशिक,दि.२ मे २०२३ – छंदोमयी ग्रुप आणि नासिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.६ आणि ७ मे रोजी छ्ंदोत्सव २०२३ हे प्रदर्शना चे आयोजन करण्यात आले आहे.हे प्रदर्शन ज्यू.स.रुंठा हायस्कूल,अशोक स्तंभ येथे आयोजित करण्यात आले आहे.

आजच्या तणावपूर्ण धकाधकीच्या जीवनात मनुष्य रिलॅक्स, रिफ्रेश होण्यासाठी आनंद शोधत असतो, मग तो कधी ट्रेकिंग,कधी पर्यटन करतो तर कोणी नाटक,सिनेमाला जातो,रिफ्रेश होतो पण ती काही काळाला पुरताच.पण काही मंडळी कायमची आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कलेत,छंदात गुंतवून घेतात कोणी गायन वादन्,चित्रकला, शिल्पकला तर काहीजण विविध पुरातन आणि आधुनिक गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी संग्रहित करतात,आणि वस्तू नुसता संग्रहित करत नाही तर त्याचा अभ्यास करून संशोधन करीत  त्या देशांची   भौगोलिक,सांस्कृतिक परिस्थितीची ही माहिती घेतात. अशाच विविध छंद असणाऱ्या महाराष्ट्रातील विविध शहरातील छंदिष्ठ मंडळींना नाशिकच्या स्वाक्षरी संग्राहक श्री प्रसाद देशपांडे यांनी एकत्र आणून छंदोमयी ग्रुप स्थापन केला आहे.

मुलांना व्हिडिओ गेम्स, मोबाईल सारख्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी हा ग्रुप अनेक शाळांमध्ये व्याख्याने आणि प्रदर्शने भरवीत मुलांना अभ्यासपूर्ण निखळ सकारात्मक आनंद देण्यासाठी प्रयत्नशील आहे.हाच उपक्रम घेऊन छंदोमयी ग्रुप आणि नासिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहा आणि सात मे रोजी ज्यू.स.रुंठा हायस्कूल,अशोक स्तंभ येथे तीस ते पस्तीस विविध प्रकारच्या छंदाच्या  छ्ंदोत्सव २०२३ हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

प्रदर्शनाचे उदघाटन  प्रसिद्ध सिने अभिनेते  चिन्मय उदगीरकर हे करणार असून नासिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री राजेंद्र कलाल हे प्रमुख पाहुणे तसेंच विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर,ग्रंथ तुमच्या दारचे विनायक रानडे, एनसी देशपांडे,इस्पलियरस्कूलचे सचिन जोशी,पुस्तक पेठचे निखिल दाते यांच्या उपस्तितीत होणार आहे.यात महाराष्ट्रातील विविध छंदिष्ठ मंडळी मुलांना छंदाची आवड निर्माण करण्यासाठी वेगवेगळे छंद जसे नोटा नाणी, स्टॅम्प्स, चमचे,बॉटल, बॉटल ओपनर, बुद्धिबळपट, सूक्ष्म गणेश, धातू शिल्प,कापूस शिल्प, खोडरबर,शार्पनर, पेन्सिल, पेन,घुबडाच्या आकाराचे दागिने, प्राचीन कुलूप, टेलिफोन, नारळ करवंटीच्या कलाकृती, बस,रेल्वे तिकीट, छोट्या कार्स आणि बाईक्स असे विविध छंद घेऊन येत आहे.सर्व नाशिककरांना हे  प्रदर्शन विनामूल्य पाहण्यासाठी छंदोमयी ग्रुपतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रदर्शनासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडल्, विश्वास बँक, ग्रंथ तुमच्या दारी,इस्पलियर स्कूल, पुस्तक पेठ अशा अनेक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या छ्ंदोत्सवसाठी प्रसाद देशपांडे,अनंत कुलकर्णी,  विनायक रानडे, एनसी देशपांडे, अच्युत गुजराती,प्राजक्ता जोशी, विनयकुमार चुंबळे राजेंद्र कलाल, श्री येवला सर,आणी छंदोमयी ग्रुपचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहे.तरी या प्रदर्शनाचा नाशिककरांनी आपल्या मुलांना छंदाचा आनंद घेण्यासाठी छ्ंदोत्सव २०२३ ला नक्की भेट द्या,विविध छंदांचा आनंद घ्या. असे छंदोमयी ग्रुपच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Prasad Deshpande says

    अभयदा आणी जनस्थान टीम मी आपला मनःपूर्वक आभारी आहे,
    हे प्रदर्शन सर्व नासिकाकरांसाठी विनामूल्य आहे,तरी सर्वांनी नक्की आपल्या मुलांना प्रदर्शन दाखवा
    प्रसाद देशपांडे
    छंदोमयी

Don`t copy text!