दुबई – महाराष्ट्रातील लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव मुंबईत आलेला पर्यटक मुंबईकरांचा आवडता पदार्थ वडा पाव खाल्ल्याशिवाय जात नाहीत.मुंबईच्या वडापावने इतर देशांमध्येही लोकप्रियता मिळवली आहे. वडा पावचे अनेक विविध प्रकारही उपलब्ध आहेत. मात्र , दुबईतील एका रेस्टोरंटने चक्क २२ कॅरेटचा वडा पाव तयार केला आहे. सध्या या वडापावची जोरदार चर्चा सुरू आहे. दुबईतील ओ पाव रेस्टोरंटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच या सोन्याच्या वडापावचा एक व्हिडिओ पोस्ट केला.
या रेस्टोरंटनेआपल्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या २२ कॅरेट सोन्याच्या वडा पावची माहिती दिली. जगातील पहिला २२ कॅरेटचा वडापाव लाँच केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शाही वडापाव ग्राहकांना देण्याची पद्धत देखील खूप खास आहे.वडा तयार करण्याआधी बटाट्याच्या भाजीमध्ये चीज टाकले जाते. त्यानंतर पीठाच्या मिश्रणात वडा टाकला जातो आणि वडा तळला जातो. या खास वड्याला सोन्याचा वर्ख लावला जातो. ग्राहकांना हा सोन्याचा वडा पाव देताना एका लाकडी पेटीत दिला जातो. त्यामुळे वडा पाव टेबलवर आल्यानंतर एखाद्या राजेशाहीचा थाट असल्याचे भासते.सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी बॉक्समधून वडा पाव ग्राहकांना सर्व्ह केला जातो. हा बॉक्स उघडताच पांढरी वाफ बाहेर येते. काही वर्षांपूर्वी दुबईतील एका हॉटेलमध्ये २४ कॅरेटचे खाण्यायोग्य सोने असलेला बर्गर बनविला होता.
दुबई पर्यटनासाठी गेल्यानंतर हा सोन्याचा वडा पाव खाण्याची अनेकांची इच्छा होईल. मात्र, त्यासाठी अनेकांना महागडा वडा पाव खाण्यासाठी खिशा मात्र हलका करावा लागेल.मुंबईमुळे जगप्रसिद्ध झालेल्या स्वस्त आणि मस्त वडापावची किंमत दुबईत चक्क १९७० रुपयांपर्यंत मिळणार आहे.
सोन्याचा वर्ख असलेल्या या शाही वडापावचा व्हिडीओ पहा
https://www.instagram.com/opaodxb