केसांच्या समस्यांवर आयुर्वेदिक उपचार

डॉ.राहुल रमेश चौधरी 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 

सौंदर्य हा शब्द इतक्या वेळा सतत कानावर पडत असतो…काय असते हे सौंदर्य….सौंदर्य म्ह्णजे आकर्षक बाह्य रुप….कि आकर्षक आणि उत्तम असा

स्वभाव,वर्तन. तस पाहिले तर दोन्हीही सौंदर्य या संकल्पनेत मोडतात.बाह्य सौंदर्य हे नखे,दात,डोळे,त्वचा,वर्ण आणि वर्णानुरुप असणाऱ्या शारिरीक बाह्य

गोष्टी असे कितीतरी गोष्टी बाह्य सौंदर्यात मोडतात.या गोष्टींवर तुमचे समाजातील स्थान,नोकरी,वैवाहीक आयुष्य,व्यवसाय अश्या अनेक गोष्टी अवलंबून

असतात.आणि यातून मग केस कसे सुटतील.केंसाचे सौदर्य हा अतिशय जवळचा विषय होवून बसला आहे.मग केस हे पुरुषांचे असो वा स्त्रीचे.आज

आपण येथे बाह्य सौंदर्यामधील केसांच्या समस्या (Hair Problems) व आयुर्वेद उपचार यावर चर्चा करणार आहोत.बाह्य सौंदर्या मधील एखाद्या जरी

घटकात कमी पणा असला तरी माणसाचा आत्मविश्वास ढासळायला लागतो.अर्थात असेही व्यक्तीमत्व असतात,कि ज्यांना या गोष्टींचा फरक पडत

नाही,कारण त्यांचे मानसिक सौंदर्य व बळ हे उत्तम असते..पण असे फार कमी बघायला मिळतात.बऱ्याच वेळेला बाह्य सौंदर्यात कमतरता असलेल्या

लोकांना गमतीने का होईना व समाजामध्ये चेष्टेला सामोरे जावे लागते.

आज केसांच्या समस्यावर चित्रपट देखील निघाले आहेत,यावरून वास्तव किती गंभीर असेल याचा अंदाज करता येतो.सुंदर केस हे व्यक्तिमत्वाची

शोभा वाढवणारे असते.प्रत्येक स्त्री-पुरुषाची इच्छा असते आपले केस दाट,पण मुलायम हवे.परंतु त्याकरीता केसांची योग्य काळजी निगा राखणे गरजेचे

आहे.

पूर्वीच्या काळी देखील आयुर्वेद शास्त्राप्रमाणे केसांचे आरोग्य अबाधित ठेवण्याकरीता नियमीत केसांना तेल लावणे,केस मोकळे सोडण्याऎवजी

बांधने,केसांना मऊ ठेवाण्याकरिता दुध व गुलाब जल वापरणे,केस रंगवण्याकरिता मेहंदी वापरणे,केस धुण्याकरीता शिकेकाई मसाला वापरणे असे

अनेक उपाय केले जायचे,पण बदलत्या काळानुसार आणि कामाच्या व्यस्ततेमुळे,बदलत्या जीवनशैलीमुळे,चुकीच्या खाण्यापिण्याच्या

सवयींमुळे,प्रदुषणामुळे,वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे,मानसिक ताणतणावामुळे,विविध आजारांमुळे,ब्युटी पार्लर मध्ये केसांवर अतिउष्ण-

अतिथंड औषधांनी केले जाणारे उपाय,तसेच कॉस्मेटीक उपचार अतिउष्ण औषधे यामुळे केसांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

त्यातच केस प्रसादन कंपन्या नवीन नवीन उत्पादने बाजारात सतत आणत असतात जी की केमिकलयुक्त असतात,त्यात् शांपू,हेयर डाय,जेल,केमिकल

हेयर कॉस्मेटिक,केस सुंदर बनवणारे साबण ,क्रिम, ऑईल असे अनेक प्रकारचे उत्पादने वाढ्ता खप हे केसांचे नुकसान करणारे द्योतक मानायला

हवे.या सर्व कारणांमुळे केस लहान वयात पांढरे होणे,केस गळणे.केस मधूनच तुटणे,केस न येणे,कोंडा होणे.केस कोरडे पडणे,सतत खाज येणे अश्या

अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.यातच शेवटी आधुनिक व कॉस्मेटीक उपचारांनी थकलेले रुग्ण शेवटी आयुर्वेदाने बरे होण्याची अपेक्षा

ठेवतात,अश्या या दिसत नसले तरी गंभीर असलेल्या केसांच्या समस्यांवर आपण विचार करणार आहोत.

१.आधुनिक  शास्त्रानुसार केसांची रचना कशी ?

तसे पाहिला गेले तर केसांची रचना अतिशय सामन्य आहे.केस हे केरॅटीन नावाच्या कठिन प्रोटीन पासून बनतात.केसांचे जे २ भाग असतात. एक भाग

म्हणजे follicle  आणि दुसरा भाग म्हणजे shaft .यामध्ये follicle केसांना त्वचेमध्ये धरून असतात,त्याच्या मूळामध्ये हेयर बल्ब असतो ज्यात केसांना

तयार करणाऱ्या जीवंत कोशिका असत्तात ज्या विभाजीत होतात व shaft  निर्मिती करतात.हेयर बल्ब मधील रक्तवाहीन्या या कोशिकांना पोषण प्रदान

करतात तथा हॉर्मोन्स केस वाढणे त्यात बदल होणे यात सक्रिय असतात..फॉलिकल मध्ये २ कोष असतात,आभ्यंतर कोष व बाह्य कोष.यात आतला

कोष हा शाफ्ट ला जोडलेला असतो.तर त्याचा शेवट हा सिबॅशियस ग्लॅण्ड(स्वेद ग्रंथी) च्या मुखावर असतो.स्वेद ग्रंथीतून निघणाऱ्या तैलीय पदार्थामुळे

केसाचे पोषण व मुलायमपणा तयार होतो.

शाफ्ट केरॅटीन पासून तयार होतो.यात ३ भाग असतात.यापैकी मधल्या भागात मेलॅलीन नावाचा घटक असतो जो केसांना रंग प्रदान करतो.केस

वाढण्याच्या तीन अवस्था असतात.केस हे प्रतिदिवस ०.३ ते ०.४ मिलिमीटर  या गतीने वाढतात.यात anagen, ketagen, talogen  असे तीन अवस्था

असतात्.पहिल्या अवस्थेत केस वाढतात.दुसऱ्या अवस्थेत केस मूळ पकडतात व तिसऱ्या अवस्थेत स्थिर राहतात.रोज किमान २५ ते १०० केस गळतात

आणि तेवढेच वाढतात.यात गळणे आणि वाढणे यात फरक असला की केस गळणे व टक्कल पडणे चा आजार होतो.

२.केसांच्या समस्यांची कारणे ?(Hair Problems)

– लोहाची,कॅल्शिअम ची कमतरता

-काळानुरुप बदलणारा आहार

– विहार-मानसिक ताण तणाव,चिंता,शोक

-वातावरणातील बदल

-प्रदूषण

-केसांची काळजी घेण्यात केलेली कमतरता

-विविध आजारांमुळे उदा.थायरॉईड,कॅन्सर,लोहाची कमतरता(ऍमेमिया) इत्यादी-सौंदर्य प्रसादन च्या अतिवापरामुळे

-पित्तकारक आहार विहार,आंबट-खारट पदार्थ जास्त खाल्ल्या मुळे

-हेअर कलरिंग,डाय,जेल,शाम्पू,उष्ण-थंड पदार्थांचा अतिवापर

-जंतांची समस्या

-अतिमैथुन-झोप व्यवस्थित न येणे

-आंघोळीकरीता खूप गरम पाणी वापरणे

-क्षारयुक्त पाण्याचा वापर

-शरीरात वात-पित्त दोष अतिप्रमाणात वाढवणाऱ्या गोष्टी जास्त प्रमाणात घेणे

.-हवा,ऊन,पाऊस यापासून केसांचे संरक्षण न करणे

-आनुवंशिकता -केस चुकिच्या पध्दतीने धुणे.

-अतिप्रमाणात घाम येणे

-उष्णतेचे विकारअश्या अनेक प्रकारचे कारणे केसांच्या समस्या तयार करतात.

३.केसांच्या समस्या कोणत्या ?

-केसांमध्ये कोंडा(dandruff/रुसी) होणे

-केस गळणे

-टक्कल पडणे

-चाई होणे

-केसांत बारिक बारीक पुळ्या होणे

-केस मधूनच तुटणे

-अकाली केस पांढरे होणे

-केस पातळ,आणि कोरडे पडणे

-केस न वाढणे

-डोक्यावर् व केसांमध्ये अतिरिक्त मळामुळे दुर्गंधी निर्माण होणे

-केस अचानक गुच्छ स्वरुपात पडणे

-केसात व डोक्यावर उवा-लिखा तयार होणे

-केसात व डोक्यावर पुळ्या,व लहान लहान आग होणाऱ्या जखमा होणे

-केसाचे व डोक्याचे समस्या चे रुपांतर त्वचा विकारात(scalp psoriasis) होणेअश्या समस्या निर्माण होतात.

४.आयुर्वेदा (Ayurveda)नुसार केसांचे वर्णन काय?

-आयुर्वेदानुसार मृदू,स्नेहयुक्त,स्थिर म्हणजे मूळ घट्ट असलेले केस ,काळेभोर केस हे योग्य मानले आहेत.

-गर्भावस्थेत सहाव्या महिन्यात केसांची निर्मिती सांगीतली आहे

-केस व केसभूमी असे दोन भाग महत्वाचे आहे आणि याची उत्पत्ती म्हणजे मस्तक म्हणजेच शिर होय

-आपण जो आहार घेतो त्या आहाराचे पचन होवून २ भाग तयार होतात एक म्हणजे सार भाग आणि दुसरा म्हणजे मलभाग .मलभागापासून केस

निर्मिती वर्णिलेली आहे

-वात,पित्त,कफ दोषानुसार केसांचे वर्णन आढळते.

वात प्रकृतीच्या व्यकतीचे केस हे रुक्ष,कोरडे,कमी प्रमाणात,आणि धूरकट रंगाचे असतात,

पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे केस मऊ,कमी प्रमाणात,पिंगट रंगाचे असतात

कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे केस स्निग्ध(स्नेहयुक्त)मोठे-लांब,भरपूर,दाट,काळे-नीळसर रंगाचे असतात

-केसांचे पोषण आयुर्वेदानुसार सात धातुंपैकी रस,रक्त,मेद,हाडे(अस्थी),मज्जा(bone marrow) या धातुंच्या पोषणावर अवलंबून असते तसेच ३

मलापैकी घाम या मळ भाग घटकावर अवलंबून असते.अश्या पध्दतीने आयुर्वेदानुसार थोडक्यात केसांचे वर्णन सापडते.

५.केसांचे परिक्षण आधुनिक व आयुर्वेद शास्त्रानुसार कसे करतात?

आयुर्वेद परिक्षण

आयुर्वेदात केसांच्या परिक्षणासह संपूर्ण शरीराचे देखील परिक्षण देखील करणे गरजेचे असते यामध्ये केसांचा रंग,केसभूमी चा प्रकार,केसभूमीचा थंड

गरम स्पर्श,केसभूमीचा रंग,केसांचे तुटण्याचे स्वरूप,केसांचे प्रमाण,केसांच्या भूमीचा स्त्राव,केस गळण्याचे प्रमाण,लहान पणापासूनच्या आजाराचा

इतिहास,स्त्री व वयात आलेल्या मुलीमध्ये मासिक पाळीचा इतिहास,पुरुषामध्ये मैथुनाचे प्रमाण,खाण्यापिन्याच्या सवयी,राहणीमान,केसांची काळजी

,केसांमध्यी होणाऱ्या पुळीचे प्रकार व त्यातील स्त्रावचे स्वरूप अश्या प्रकारचे सर्व सामान्य व विशेष परिक्षण केले जाते.

आधुनिक परिक्षण

स्त्री मध्ये

follicualar stimulating hormone,leuitinising hormone,densitometry,TIBC(iron binding capacity),T3-T4-TSH,scalp

biopsy,VDRL,CBC(complete blood count),hairpull test,examination by magnifier,DHEA TEST,serum iron,serum

ferritin,prolactin level,testosterone level,androsterodione level ,calcium level,some other diseases related test या तपासण्या

केल्या जातात.

पुरुषांमध्ये

norwood Hamilton/savin scale,scalp biopsy,densitometry,semen analysis,iron binding capacity,calcium level,hairpull

test,serum iron,serum ferritin,examination by magnifier some diseases related tests या तपासण्या केल्या जातात.

६.केसांच्या समस्यांवर आधुनिक उपचार कोणते?

केसांच्या परिक्षणात ज्या गोष्टींची शरीरात कमतरता जाणवते त्यानुसार औषधे दिलि जातात.उदा.कॅल्शिअम् च्या कमतरतेमुळे केस गळत असतील तर

कॅल्शिअम सप्लिमेंट दिले जातात.याशिवाय हेअर ट्रान्सप्लांट हि अत्याधुनिक उपचार पध्दती आधुनिक शास्त्रात उपलब्ध आहे.

७.केसांच्या समस्यांवर आयुर्वेद उपचार कोणते ?

-आयुर्वेद उपचारपध्दती ही केसांच्या उपचारांकरीता वरदान आहे.यामध्ये मुख्य टप्पे पडतात.

*पथ्य व आहार

*विहार

*केसांची काळजी

*मानसिक समुपदेशन

*पंचकर्म व उपकर्मे

*औषधे

*योगा

रसायन चिकित्सा

अ)पथ्य व आहार- पथ्य या संकल्पनेत काय खाणे टाळावे या गोष्टींचा अंतर्भाव होतो.तसेच कोणत्या गोष्टी खाण्यायोग्य आहेत हे देखील या अंतर्गत

सांगितले जाते.साधारणत: तिखट मसाल्याच्या भाज्या,तेलकट पदार्थ,आंबवलेले पदार्थ,दूध व अन्नपदार्थ इत्यादी गोष्टी विस्तृत पणे मांडल्या जातात व

समजावून सांगीतल्या जातात.तसेच काय खाल्ले पाहीजे केसांना पोषण कशाने मिळते यात दूध,राजगीरा,बदाम,डिंकाचे लाडू,काही जेवणाच्या रेसिपिज

इत्यादी गोष्टी समजावून सांगितल्या जातात.

ब)विहार-विहार म्हणजे पाऊस ऊन थंडी या मध्ये केसांची काळजी कशी घ्यावी संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन केले जाते.

क)केसांची काळजी -हा भाग अतिशय महत्वाचा मानला जातो.जर तुम्ही औषधे घेत असालशिवाय इतर उपचार देखील करत असाल तरी देखील

केसांची योग्य निगा न राखली गेल्यास तुमच्या केसांच्या समस्या तशाच सुरु राहतात.

-केसांची काळजी घेताना योग्य ते मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे

-केस कायम मोकळे सोडू नये

-सौंदर्य प्रसाधने,केमिकल शाम्पू इत्यादी गोष्टींचा अत्यधिक वापर टाळावा

-जाहीरातींना फसून उगाच जेल,साबण, तेल,शाम्पू,मेहंदी नैसर्गिक व सुरक्षित आहे असे समजून खूप वापर करू नये.

-केस धुतांना साबणाचा वापर करू नये

-केस धुताना शिकेकाई मसाला इत्यादी योग्य त्या गोष्टींचा वापर करावा.

-केस धुतल्यानंतर खूप घासून पुसु नये.हलक्या हाताने पुसावे

-उगाच केस वाळवण्याकरिता ड्रायर चा अतिरिक्त वापर करू नये

-केस ओले असताना तेल लावणे टाळावे-

केसांना मेहंदी लावताना पूर्ण सुरक्षित व आयुर्वेद तज्ञाने तयार केली आहे का याची खातरजमा करावी.

-केसांना नियमीत तेल लावावे.

-आपल्या प्रकृतीनुसार केसांना जे योग्य असेल तेच खाद्यपदार्थ खावेत.

-हेअर स्ट्रेटनिंग,हेअर स्प्रे,जेल,कलरिंग डाय अश्या कॉस्मेटीक पध्दतीचा वापर टाळावा

-योग्य तो आहार घ्यावा

-झोप् आवश्यक प्रमाणात घ्यावी

-नियमीत व्यायाम,योगा,प्राणायाम करावा

-राग,दु:ख याचा अतियोग टाळावा

-केसांना तेल लावताना बोटांची पेरे तेलात बुडवून हलक्या हाताने तेल लावावे.

ड)मानसिक समुपदेशन-चिंता,शोक,अतिताण ह्या गोष्टी केसांच्या समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.याकरीता मानसिक समुपदेशन करुन घ्यावे तसेच मानसिक समस्यांच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा.

इ)पंचकर्म व उपकर्म=हा अतिशय महत्वाचा दुसरा भाग मानला जातो.याअंतर्गत

शिरोलेप

शिरोलेप हे चाई.केस पांढरे होणे,केसांमध्ये उवा लिखा होणे,केसांमध्ये खाज सुटणे,केसांमध्ये पुळ्या होणे,कोंडा होणे या सारख्या समस्यांकरीता विविधा

औषधांचा औषधी काढ्यात भिजवून शिर भागावर लेप केला जातो.याकरीता केस पूर्ण कापणे किंवा केसांवर या दोन्ही पध्दतीने लेप केला जातो.

शिरोधारा-

शिरोधारा म्हणजे कपाळाच्या भ्रूमध्य प्रदेशावर काही ठरावीक अंतरावरून औषधी तेलाची वा काढ्याची धारा ठरावीक काळापर्यंत चालू ठेवणे.यामध्ये

धारा ही संपूर्ण शिरोभागावर फिरवली देखील जाते.शिरोधारा केस गळणे,कोंडा होणे,केस पांढरे होणे,केसांचे पोषण न होणे,झोप् न येणे,केसांमध्ये खाज

सुटणे या समस्यांकरीता केली जाते

शिरोधारा-

शिरोधारा म्हणजे कपाळाच्या भ्रूमध्य प्रदेशावर काही ठरावीक अंतरावरून औषधी तेलाची वा काढ्याची धारा ठरावीक काळापर्यंत चालू ठेवणे.यामध्ये

धारा ही संपूर्ण शिरोभागावर फिरवली देखील जाते.शिरोधारा केस गळणे,कोंडा होणे,केस पांढरे होणे,केसांचे पोषण न होणे,झोप् न येणे,केसांमध्ये खाज

सुटणे या समस्यांकरीता केली जाते

शिरोबस्ती-

शिरोबस्ती मध्ये रुग्णाच्या डोक्यावर उभे पाळे करुन त्यात तेल किंवा काढा कोमट करून ठराविक काळापर्यंत साचवून ठेवले जाते याद्वारे तेल

शिरोभागात जिरवले जाते.याचा उपयोग केस गळणे,केस मधूनच तुटणे,केसामध्ये पुळ्या होणे,केसात खाज सुटणे,कोंडा होणे यावर केला जातो.

जलौकावचारण-

जलौकावचारण म्हणजे जळू (leech) लावणे होय याद्वारे शिरोभागातील अशुध्द रक्ताचे निर्हरण म्हणजेच काढले जाते.याचा उपयोग चाई होणे,टक्कल

पडणे यासाठी केला जातो.

सेचन-

यामध्ये केस हे औषधी काढ्याने धारा केली जाते व त्यानंतर शिरोधारा,शिरोबस्ती,शिरोभ्यंग,शिरोतर्पण,नस्य किंवा शिरोलेप केले जातात.

नस्य- ही प्रक्रिया केसांना पोषण पुरवणे,केसामधील घाण काढणे यासाठी केली जाते यात विविध प्रकारचे चूर्णे,तेल नस्या कारीत म्हणजेच नाकात औषध

टाकण्याकरीता वापरले जाते.

स्नेहन- केसांना औषधी तेलाने मसाज करणे म्हणजेच स्नेहन होय

क्षालन- यामध्ये केस हे औषधी काढ्याने धूवून काढले जातात व त्यानंतर शिरोधारा,शिरोबस्ती,शिरोभ्यंग,शिरोतर्पण,नस्य किंवा शिरोलेप केले जातात.

प्रच्छान-

हा प्रकार जलौकावचरनाप्रमाणेच आहे

रक्तमोक्षण- रक्तमोक्षण हा देखील प्रकार प्रच्छन व जलौकावचारणाप्रमाणे च आहे

शिरोअभ्यंग-शिरोअभ्यंग हे पंचकर्म स्नेहन प्रमाणेच केले जाते

बस्ती-

बस्ती या प्रकाराचे माहीती आपण दर लेखात घेताच असतो.यात शौचाच्या जागेद्वारे काढा,मांसरस,दूध,मध याची औषधे सोडले जातात.याचा उपयोग

केसांची वाढ करणे,केसांना पोषण देणे,केस गळणे याकरीता केला जातो.

धूमपान व धूम देणे –

यात औषधी वनस्पतींच्या काढ्याने केस धुतल्यानंतर केसांना औषधी वनस्पतींचा धूर दिला जातो.याचा उपयोग कोंडा,उवा लिखा होणे याकरीता

करतात,तसेच अतिरिक्त घाण काढण्याकरीता तोंडाने व नाकाने धूर घेतला जातो.*शिरोपिचूधारण- यामध्ये डोक्याच्या मध्यभागी औषधी तेलाचा किंवा

औषधी चूर्णाचा तेलात गोळा करुन ठेवला जातो व त्यात बांधले जाते

शिर:सेक

-हे कर्म सेचन या प्रकाराप्रमाणेच आहे

केशप्रसाधन-

केशा प्रसाधनात वेळच्या वेळी केस कापणे,केस धुणे,केस औषधी मेहंदीने रंगवणे,केस स्वच्छ करणे या क्रिया केल्या जातात.

ई)औषधोपचार-

यानंतर येतो तो औषधोपचारांचा भाग यात औषधी तेले,ब्राह्मी,शंखपुष्पी,जटामांसी,गंधक रसायन,सूक्ष्म त्रिफळा,महामंजिष्ठादी काढालाक्षादी

गुग्गुळ,निंब,दारूहरिद्रा,कृमीकुठाररस,विडंग,आरोग्यवर्धिनी,अस्थीपोषक वटी,अणुतैल,पंचेंद्रिय वर्धन तैल,लघुमालीनीवंसत,मधुमालीनी वसंत.मण्डूर,

प्रवाळपिष्टी,सुंठ्-मिरे-पिंपळी,लाक्षा,गैरीक,कासीस,मोरचूद,माका,काळे तीळ,त्रिफळा,स्वायंभुव गुग्गुळ,त्रिफळा गुग्गुळ,जास्वंद,केलीचे पान,बकरीचे

दूध,ज्येष्ठेमध,ताप्यादी लोह,सप्तामृत लोह,गोदंती,रौप्य भस्म अश्या असंख्य-अगणित औषधांचा वापर केला जातो.तसेच शिकेकाई.रीठा यासारख्या केश

धुण्याकरीता औषधांचा वापर केला जातो,तसेच मेहंदीपत्र,मण्डूर,लोहभस्म यासारख्या औषधांना औषधी काढ्याचीभावना देवून त्याना औषधी काढ्यात

घोटून केस रंगण्याकरीता उपयोग केला जातो.

उ) योगा व प्राणायाम-केसांचे आरोग्य टिकण्याकरीता भ्रामरी,अनुलोम-विलोम,षट्चक्रे ध्यान,मुद्रा,वज्रासन,पवनमुक्तासन,उत्तानासन,शीर्षासन,शवासन

याचा उपयोग करावा

ऊ) रसायन चिकित्सा-केसांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तक्रारी येवू नये म्हणून जे उपचार केले जातात त्यास रसायन चिकित्सा म्हणतात यात

,आवळा रसायन,च्यवनप्राश,त्रिफळा रसायन,रसायन् चूर्ण,विडंग रसायन,माका रसायन,कुष्मांडपाक असे अनेक रसायन सेवना करीता दिले

जातात.अश्याप्रकारे आयुर्वेदात उपचार केले जातात.

८) सरतेशेवटी लेख संपवतांना

आज बाजारात अनेक विध केशप्रसाधने,तेल,शांपू,साबण मिळतात,त्याचा वापर भरपूर प्रमाणात सगळे जण करतांना दिसतात,बरेच लोक

कोरफड,आवळा ज्युस च्या बॉटल्स रिचवताना दिसतात पण…याचे परिणाम आरोग्यावर योग्य दिसणे तर दूरच पण विपरीत दिसतात.दोन-पाच लोकांना

फरक दिसला म्हणजे सगळ्यांनाच दिसतो असे होत नाही,शेवटी पुन्हा प्रश्न हा च येतो की असे का होते याचे कारण प्रत्येक माणसाची व्यक्तीची प्रकॄती

ही वेगवेगळी असते,दोष वेगवेगळे असतात त्यानुसार औषधे,केशप्रसाधने वापरावयास हवी,सगळ्यांना एकाच तेलाने फरक पडत नाही, आणि हे

वेळोवेळी पुराव्याने सिध्द आहे.त्यामुळे सावधान………!!!!धन्यवाद.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क-9096115930

ई-मेल-ar19chaudhari@gmail.com

 

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.