चेहऱ्याचे सौंदर्य जपण्यासाठी आयुर्वेदिक उपचार 

चेहऱ्याचे विविध आजारांवर आयुर्वेदानुसार काय काय उपचार केले जातात ?

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 

आज काल प्रत्येक जण आपल्या सौंदर्याबाबत सजग असतो,त्यामुळे आज सौंदर्य उपचारास प्राधान्य प्राप्त झाले आहे. सौंदर्य हे वेगवेगळ्या गोष्टीचे असते..केसांचे…डोळ्यांचे…नखाचे…चेहऱ्याचे….दातांचे….बुध्दीचे तसेच इतर अनेक प्रकारचे सौंदर्य असते.आज आपण चेहऱ्याच्या सौंदर्याबाबत बोलणार आहोत.चेहरा सुंदर दिसावा या करिता सगळेच सजग असतात.पण याच चेहऱ्याचे सौंदर्य कमी कोणत्याही कारणाने झाले तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास लगेच कमी होतो.याव्यतिरिक्त त्याच्या कामावर व्यक्तिमत्वावर देखिल याचा परिणाम होतो.त्या व्यक्तिच्या मनात न्युनगंड निर्माण होतो.पण याच व्यक्तिचे जर सौंदर्य खुलले तर लगेच त्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो.

अश्या या चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्याकरीता लोक काय काय करत नाही, फेसपॅक लावणे,कोरफड,साय,हलद आणि असे बरेच काही….चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्याला काही एक कारण नाही अनेक कारणे आहेत यात,चेहऱ्यावर पिम्पल्स येणे,चेहऱ्यावर काळे डाग,वांग,तीळ भरपूर प्रमाणात निर्माण होणे,चेहऱ्यावर मस्से तयार होणे,डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होणे,चेहऱ्याची त्वचा काळपट होणे अश्या अणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.या अश्या अनेक प्रकारच्या समस्यांकरीता आयुर्वेद नक्की काय सांगतो,आयुर्वेदात यावर कोणते उपचार आहेत ,या समस्या कश्या निर्माण होतात.याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत.लेखाच्या सुरुवातीला त्वचा म्हणजे नक्की काय कशी तयार होते याबाबत जाणून घेणे गरजेचे ठरेल.

१.त्वचा म्हणजे काय कशी तयार होते ?

आयुर्वेदा नुसार त्वचा ही क्षीरस्य सन्तानिका….म्हटलेले आहे.म्हणजेच दूधाची साय म्हटलेले आहे.यावरूनच कल्पना करता येते की त्वचा केवढी नाजूक म्हणून वर्णित आहे.अशी ही त्वचा आयुर्वेदानुसार ७ स्तर असलेली आहे.प्रत्येक स्तराला धरून काही आजार वर्णन केले आहेत….त्यानुसार समजते की आपल्याला कीती तीव्रतेचे करावे लागते हे ठरते.असो तो या लेखाचा भाग नाही.पण जे काही त्वचेशी संबधीत व्याधी वर्णन केले आहेत ते सर्व या त्वचेच्या ७ थरांशी निगडीत आहे.ही त्वचा पुरुष शुक्र व स्त्री आर्तव यांच्या सारभूत भागाच्या पचनापासून निर्माण होते गर्भ निर्मिती वेळी.

२.त्वचा व त्याच्याशी निगडीत दोष कोणते ?

वात दोष हा प्रामुख्याने त्वचेच्या आश्रयाने असतो,याशिवाय त्वचेत भ्राजक पित्ताची,रंजक पित्ताची उपस्थिती असते.तसेच सात धातु परंपरा आपण प्रत्येक लेखात पाहतो त्यानुसार प्रत्येक धातुच्या सारतेवर त्वचेच सौदर्य अवलंबून असते.

३.चेहऱ्याचे सौंदर्य नक्की कशामुळे खराब होते  ?

आपण त्वचा निर्मीती कशापासून होते ते बघितले.यामध्ये जो शुक्र व शोणित याचा सारभाग वर्णन केला आहे तसेच जे सात धातु वर्णन केले आहे हे सर्व कशावर अवलंबून आहे तर पचनसंस्थेवर ….याचा अर्थ असा की जर सात धातु उत्तम तयार होत असतील योग्य पचनामुळे तर आणि तरच त्वचेचे सौंदर्य अबाधित राहते..अन्यथा त्वचा ही खराब होते.यचा अर्थ पथ्यपालन गरजेचे आहे.
त्वचेचे सौंदर्य खराब होते म्हणजे नक्की काय होते…चेहऱ्यावर-

.मूखदूषिका (पिंपल्स)
ब.काळे डाग(ब्लॅक स्पॉट्स)
.वांग
ड.काळे तीळ
इ.डोळ्यांखालील काळी वर्तुळे(ब्लॅक रिंकल्स)
ई.चेहऱ्याची त्वचा कोरडी पडणे(ड्राय स्किन)
उ.चेहऱ्याची त्वचा अतिशय स्निग्ध/तेलकट असणे(ऑइली स्किन)
.चेहऱ्यावर मोस तयार होणे(मॉस)
.चेहरा काळपट पडणे(ब्लॅकिश स्किन)अश्या अनेक प्रकारच्या तक्रारी रुग्णांमध्ये दिसतात.

४.चेहऱ्याची त्वचा खराब होण्याचे कारणे काय ?

-फास्ट फूड,जंक फूड(चायनीज इत्यादि)-जेवणाच्या वेळा निश्चित नसणे-अति उष्ण तिखट खाणे-हॉर्मोनल बदल-चेहऱ्याची योग्य काळजी न घेणे-जास्त उन्हात फिरणे-पार्लर मध्ये ऍसिड पिल,फेशिअल्स इत्यादि चा अतिप्रमाणात वापर करणे-चेहरा योग्य त्या फेसवॉश ने न धुणे-केमिकल युक्त सोप,फेसवॉश वापरणे-अतिशय तेलकट पदार्थ खाणे-आंबट खारट पदार्थांचे अत्यधिक सेवन करणे-मासिक पाळी योग्य वेळी न येणे,मासिक पाळीच्या समस्या असणे-दूध नासवलेले पदार्थ,व आंबवलेले पदार्थांचे अत्यधिक प्रमाणात सेवन करणे-भूक नसताना एकावर एक खाणे-अतिप्रमाणात उपवास करणे-जेवन करून दुपारी लगेच झोपणे-आधुनिक औषधांचे अत्यधिक सेवन करणे-विविध कारणाकरिता शरीरावर वारंवार सर्जरी होणे-हस्तमैथुन,अतिप्रमाणात व्यवाय -मानसिक ताण तणाव,चिंता,शोक इत्यादि कारणांचा समावेश होतो.

५.आयुर्वेद पध्दतीने उपचार पथ्यपालन

-आयुर्वेद पध्दतीने उपचार करताना काही गोष्टी लक्षात घेण्यासारखे आहेत.यात चेहऱ्याचे योग्य ते परिक्षण पध्दतीने होतायेत की नाहि..याकडे रुग्णाने लक्ष देणे गरजेचे आहे.शिवाय वरील कारणे,त्वचा विकार निर्मिती पाहता त्वचा विकाराचा मार्ग जर विकृत पचनातून जात असेल तर मग फक्त फक्त वर वर लेप लावून ,लेसर करून,फेशिअल करून या गोष्टी पूर्ण जातील का? याचे उत्तर प्रत्येक मनुष्याने शोधने गरजेचे आहे.व योग्य ते उपचार घेणे गरजेचे ठरते.पथ्यपालन करताना व ज्या गोष्टी कारणीभूत सांगितल्या आहेत त्या गोष्टी न सेवन केलेल्या बऱ्याच.फळभाज्यांचे भरपूर सेवन करणे योग्य.

आयुर्वेदानुसार काय काय उपचार केले जातात ?

औषधोपचार-

आयुर्वेदात चेहरा खुलवण्याकरीता आधी त्या रुग्णाचे पचन सुधरवले जाते.यात आधी रुग्णाचे दोषानुसार सूतशेखर,शंख,मुस्ता इत्यादि औषधांचा वापर करून पचन सुधरवले जाते,व त्यानंतर योग्य त्या पोषक व शामक औषधांचा वापर करून सौंदर्य वाढवण्यास मदत केली जाते.यात सारिवा,मंजिष्ठा,रक्तचंदन,लोध्र,मुस्ता,निंबपत्र,कचोरा,श्वेतचंदन,शतावरी,यष्टीमधु इत्यादि औषंधाचा वापर केला जातो.औषधोपचारात आधी पाचक पित्त,रंजक पित,क्लेदक कफा यांच्यातील दोषांचे योग्य रीतीने पाचन करून नंतर बृंहण व शमन औषधांचा वापर केला जातो.

पंचकर्म उपचार

वमन- वमन पंचकर्म मुख्यत: चेहऱ्यवरील पिंप्ल्स करीता वापरले जाते.यामध्ये निंबपत्र काढा,मदनफळ काढा,पटोलपंचांग काढा यासारखे काढे वापरले जातात.विरेचन,रक्तमोक्षण,जलौकावचारण- वेगवेगळ्या चेहऱ्याच्या विकारात जेथे पित्त व रक्त दुष्टी अधिक प्रमाणात आहे तेथे वापरले जाते.

नस्य- नस्य कर्म हे व्यंग,चेहऱ्यावरील त्तीळ,नीलिका यासाठी वापरले जातात.

शिरोधारा-मानसिक ताण तणावामुळे जर चेहराचे विकार होत असतील तर तेथे शिरोधारा,नस्य केले जातेअशी पंचकर्मे रुग्णांचे बळ पाहून यात वापरली जातात.

लेप

चेहरा म्हणा की इतर त्वचाविकार या मध्ये त्वचेचे सात स्तर सुधरवायचे असतील तर बाहेरून व आतून अशी दोन्ही बाजूंनी उपचार करणे गरजेचे आहे.यामध्ये आभ्यंतर उपचार तर वर्णन केलेचा आहे पण बाह्य उपचारांत विविध लेपांचा वापर केला जातो.लेपांमध्ये आभ्यंतर उपचारात जी द्रव्ये वापरतात तीच द्रव्ये बाह्य उपचारात वापरतात.

अग्निकर्म-

अग्मिकर्म ही एक आयुर्वेदाची समृध्द शाखा आहे.याद्वारे तील,मोस हे काढले जावू शकतात तसेच त्यात पुन्हा चेहऱ्याचा त्या ठिकाणचा प्राकृत वर्ण देखील प्राप्त करुन देता येते.

अश्या पद्ध्दतीने चेहऱ्यांच्या विकारांवर योग्य उपचार केले जातात.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क-9096115930
ई-मेल-ar19chaudhari@gmail.com

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.