नाशिक,दि.१९ जुलै २०२३ –गेल्या आठवड्यात १२ जुलै रोजी सप्तशृंग गडावरील गणपती टप्प्याजवळ बस दरीत कोसळली होती.या अपघातात बसमधील एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता तर चालक वाहक यांच्यासह २२ जण जखमी झाले होते.हि बस काढण्याचे काम आज सकाळी सुरु होणार असल्याने सप्तशृंगगड ते नांदुरी आणि नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता आज (१९जुलै) बंद राहणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाखाली कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी हे आदेश जारी केले असून अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्यासाठी राज्य परिवहन मंंडळाच्या कळवण आगार व्यवस्थापनाने परवानगी मागितली होती. राज्य परिवहन मंडळ ही बस दरीच्या बाहेर काढण्याची कार्यवाही करणार आहे.या साठी सुमारे सहा ते सात तास लागू शकतील अपघातग्रस्त बस काढल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरु होईल असं सांगण्यात आलं आहे.