नितीश कुमारांच्या पावलांनी वाढला सस्पेन्स! भाजपा ‘मौन’, जेडीयूची बैठक पुढे

बिहारच्या सत्तासमीकरणात नवा ट्विस्ट

0

नवी दिल्ली, दि. १७ नोव्हेंबर २०२५ Bihar Politics 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागून 70 तास उलटले, तरी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. रविवारी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेण्याची व राजीनामा सादर करण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरही, त्यांनी राजीनाम्याची योजना बदलली. त्यामुळे बिहारच्या राजकारणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

🔶 शेवटच्या क्षणी ‘प्लॅन चेंज’—राजभवनात फक्त पत्र सादर (Bihar Politics 2025)

१५ नोव्हेंबरला मंत्रिमंडळ बैठक बोलावून राजीनामा देणार असल्याची माहिती पसरली होती. परंतु राजभवनात पोहोचल्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांना राजीनामा न देता फक्त एक पत्र दिले. या पत्रात १७ वी विधानसभा १९ नोव्हेंबरपासून विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. या निर्णयाची कोणालाही कल्पना नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या—“नितीश पुन्हा एकदा अनपेक्षित पाऊल उचलणार का?”

🔶 जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे

१७ नोव्हेंबरला होणारी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली.८५ पैकी सर्व आमदार पाटण्यात हजर असूनही, नितीश कुमार यांनी बैठक उद्यावर ढकलली. उद्या खरोखर बैठक होईल कायाबद्दलही अनिश्चितता आहे.या बैठकीत जेडीयूचा नेता (मुख्यमंत्रीपदाचा दावा करणारा) निश्चित होणार आहे. त्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आणि मग एनडीएची संयुक्त बैठक होणार आहे. जेडीयूने आपल्या सर्व आमदारांनापुढील आदेश मिळेपर्यंत पाटण्यातच थांबा” असा संदेश दिला आहे.

🔶 भाजपचे ‘मौन’ संशय वाढवणारे

निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या विक्रमी 202 जागांच्या विजयावर भाजप आनंद व्यक्त करत असला, तरी मुख्यमंत्रिपदावर भाजप आजवर एकही स्पष्ट विधान करत नाही.विनोद तावडे आणि नितीन नवीन यांच्या गूढ विधानांनी चर्चा आणखी वाढली आहेविनोद तावडे: “आता विजय साजरा करण्याची वेळ आहे. योग्य वेळी सर्व उत्तरे मिळतील.”नितीन नवीन: “एनडीएमध्ये सर्व काही नीट आहे. प्रक्रिया सुरू आहे.”दोन्ही नेत्यांनी नितीश कुमारंचे नाव पुष्टी करण्यास नकार दिल्याने नवा सस्पेन्स तयार झाला आहे.

🔶 मग गोंधळ कशाचा?

नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याची तयारी करूनही माघार घेतली

भाजपकडून CM पदावर मौन

जेडीयू बैठका पुढे ढकलत आहे

विधायकांना पाटण्यात ‘हजर रहा’ असा आदेश

एनडीए नेता निवडीची प्रक्रिया सुरूही नाही

🔶 नवा मुख्यमंत्री येणार? की नितीशच परत?

राजकीय सूत्रांचं म्हणणं

नितीश कुमार यांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार ते अनेकदा वेगवेगळ्या वेळेस ‘स्टॅटेजिक सायलेंस’ ठेवून निर्णय अचानक घेतात. त्यामुळे BJP एखादा नवा चेहरा पुढे करणार की नितीशच पुढे जाणारया दोन्ही शक्यता तितक्याच जिवंत आहेत.बिहारच्या राजकारणात पुढील 24 तास निर्णायक ठरणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!