मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. १२ जणांचे विश्वस्त मंडळाचे गॅझेट काढून जाहीर केलं आहे.विश्वस्थांमध्ये नाशिकचे माजी आमदार जयंत जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.
काल गुरुवारी रात्री महाराष्ट्र सरकारने अधिकृत नावांची घोषणा केली आहे. या यादीत अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय.कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील ९ जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आलीय तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सहकारी राहुल कणाल यांनासुद्धा विश्वस्त पदाची लॉटरी लागली आहे.
साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ
आमदार आशुतोष काळे (अध्यक्ष)
जगदीश परीश्चंद्र सावंत (उपाध्यक्ष)
जयंतराव पुंडलिकराव जाधव
अनुराधा गोविंदराव आदीक
सुहास जनार्दन आहेर
अविनाश अप्पासाहेब दंडवते
सचिन रंगराव गुजर
राहुल नारायण कणाल
सुरेश गोरक्षनाथ वाबळे
महेंद्र गणपतराव शेळके
एकनाथ भागचंद गोंदकर
अध्यक्ष शिर्डी नगर पंचायत