दुरावलेल्या दीपा कार्तिकला त्यांच्या मुली पुन्हा एकत्र आणतील का ?

0

मुंबई – स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेच्या कथानकात लीप आला असून दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकी असं या दोघींचं नाव असून आता दुरावलेल्या कार्तिक आणि दीपाला या दोघी एकत्र आणणार का याची उत्सुकता वाढली आहे.

चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीला आपण याआधी काही भागांमधून भेटलोच आहे. आता लीपनंतर मोठ्या झालेल्या दीपिका आणि कार्तिकीला २० सप्टेंबरच्या विशेष भागातून भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या या दोघींच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळत असून दोघींची सेटवर खूप छान गट्टी जमली आहे. दीपा आणि कार्तिकही सेटवरच्या या छोट्या दोस्तांना भेटून खुपच खुष आहेत. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय रंगतदार असणार यात शंका नाही.रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.