आजचे राशिभविष्य शुक्रवार,१७ सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्रनक्षत्र श्रवण (उद्या पहाटे ३.३६ पर्यंत) एकादशी आज सकाळी ८.०८ पर्यंत आहे.
आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस, *परिवर्तीनी एकादशी* आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:- दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी हलके फुलके वातावरण राहील. शत्रू निर्माण होऊ देऊ नका.
     
वृषभ:- गूढ स्वप्ने पडतील. सावकाश वाटचाल करा. फार मोठे धाडस नको. काळजीपूर्वक निर्णय घ्या.
 
मिथुन:- मन अस्वस्थ राहील. काळजी वाढेल. मात्र मार्ग सापडेल. उपासना लाभदायक ठरेल.
 
कर्क:-  प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. विवाहित व्यक्तींना दिवस आनंदाचा जाईल.
 
सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. अनुकूल परिस्थिती आहे. शत्रूनाश होईल. नोकर चाकर त्रास देऊ शकतात.
  
कन्या:- कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. मुलांशी संवाद साधा. धाडसी निर्णय घ्याल. 
 
तुळ:- सौख्य लाभेल. विनम्र स्वभावाचा लाभ होईल. ऐश्वर्य पूर्ण दिवस आहे. 
 
वृश्चिक:- दिवस मजेत जाईल. उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. महत्वाचे विचार ऐकावयास मिळतील.
 
धनु:- खर्चात वाढ होऊ शकते. प्रिय व्यक्तींना दुखवू नका. कठोर बोल नकोत.
 
मकर:- मन प्रसन्न राहील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
 
कुंभ:- अंतर्मुख करणारा दिवस आहे. नियोजनात मन रमेल. आत्ममग्न व्हाल. हुरहूर वाढेल.
 
मीन:- आर्थिक आवक चांगली आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न दिवस आहे.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.