नाशिक – नाशिक महानगर पालिके तर्फे उद्या २६ जुलैला नाशिक शहरातील ३६ लसीकरण केंद्रांवर नागरीकांचे लसीकरण होणार असल्याची माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली.
कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच उद्या लसीकरण होणार असून पहिल्या डोस घेणाऱ्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे ही सांगण्यात आले आहे. अनेक नागरीकांचा दुसरा डोस बाकी आहे. त्यांना उद्या लस घेता येणार आहे.
खालील लसीकरण केंद्रावर कोव्हीशिल्डचा दुसरा डोस मिळणार आहे.