हिमाचल प्रदेशात भूस्खलन : थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

0

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात भयानक भूस्खलन झाले असून यामध्ये ९ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत २ जण जखमी झाले असून या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हि घटना इतकी भयानक होती कि नदीवरील पुलाचे क्षणार्धात दोन तुकडे झाले.हि सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून व्हिडीओत डोंगरावर भूस्खलन झालेलं दिसतंय. दरड कोसळून खाली आलेले दगडानी क्षणार्धात सर्व उध्वस्त करून टाकले आहे. अचानक झालेल्या या भूस्खलनना मुळे प्रवाशांनी भरलेली गाडी कोणाला काही समजण्याच्या आत या दगडांखाली दबली गेली.

या घटने बाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराची जवाबदारी हिमाचलप्रदेश सरकारने घेतली आहे असे मुख्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.