सरकार आणि सानिकामध्ये सर्वेशमुळे येणार दुरावा ?

0

मुंबई ,दि, ८ जानेवारी, २०२५ : नव्या वर्षात ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकार – सानिकाची लव्हस्टोरी झाली आहे पण हि लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच सर्वेश नावाचं ग्रहण याला लागणार आहे. कारण आता सर्वेशमुळेच – सरकार सानिका मध्ये दुरावा येणार आहे असं वाटू लागलं आहे. सरकार सानिकाच्या मनात एकमेकांबद्दल हळूहळू प्रेम भावना निर्माण झाल्या आहेत. सानिकाला सरकार आवडू लागला आहे याची पूर्ण कल्पना पंकजा आणि सर्वेशला आहे. आणि आता म्हणूनच सरकार – सानिकामध्ये कायमचा दुरावा यावा यासाठी सर्वेश एक डाव खेळणार आहे. आता सर्वेशची  खेळी त्यावर उलटणार कि खरचं त्यात सरकार -सानिका अडकणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत राहा पहा # लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा.आपल्या कलर्स मराठीवर!

ट्रिप दरम्यान सानिकाला सरकारच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे हे कळत. दोघे ट्रीपवरून परत येतात आणि तेव्हाच पंकजा सानिकाला सांगते की तिचा आणि सर्वेशचा साखरपुडा ठरलाय. सानिका आणि सरकारला धक्का बसतो.  हे सगळं ऐकून सरकारला वास्तवची जाणिव होते आणि तो ते स्वीकारायचं ठरवतो तर दुसरीकडे सानिकाला वाटतंय राजाने प्रेम कबूल करावं. सानिका राजाला मिठी मारते. सानिका राजाला विचारते कि तुझ्या फिलिंग सांग ज्यावर राजाने ठामपणे नकार देतो. सानिकाला सत्य स्विकारता यावं म्हणून सर्वेशने सांगितल्याप्रमाणे राजा आता सर्वेश आणि सानिकाच्या साखरपुड्याची तयारी करण्यास होकार देतो. सरकार प्रेमाची कबुली देईल का? साखरपुडा खरंच पार पडणार का? पुढे काय होणार ?

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!