मराठी भाषेला अभिजात दर्जा :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमके काय झाले? मराठीला त्याचा काय फायदा? 

0

नवी दिल्ली ,दि,३ ऑक्टोबर २०२४ – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने मोठा निर्णय घेतला असूनमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत आज (दि. ३) चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.अनेक वर्षांपासून मराठी साहित्यीक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती. अखेर या सर्वांचे स्वप्न आज पूर्ण झाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी अभिजात भाषांच्या यादीत आणखी पाच भारतीय भाषांचा समावेश केला. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना आता अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. अभिजात भाषा या समृद्ध भाषा आहेत ज्या प्रत्येक समुदायाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्रदान करतात ज्यांनी भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा जपला आहे.

अभिजात भाषा हा दर्ज मिळण्यासाठी निकष काय
– संबंधित भाषा प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे
– भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे लागते
– त्या भाषेला स्वत:चे स्वयंभूपण असावेत
– प्राचीन भाषा आणि तिचे अधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली यांना अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले की मला खूप आनंद होत आहे की महान बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, विशेषत: दुर्गापूजेच्या शुभ मुहूर्तावर. बंगाली साहित्याने गेल्या काही वर्षांत असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. यासाठी मी जगभरातील सर्व बंगाली भाषिकांचे अभिनंदन करतो.

त्याचवेळी पीएम मोदींनी मराठी भाषेबाबतही मोठी गोष्ट सांगितली आहे. मराठी ही भारताची शान असल्याचे ते म्हणाले. या अभूतपूर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान आपल्या देशाच्या इतिहासात मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाची कबुली देतो. मराठी हा नेहमीच भारतीय परंपरेचा आधारस्तंभ राहिला आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेकांना ती शिकण्याची प्रेरणा मिळेल.

रोजगाराच्या नवीन संधी उघडतील
अभिजात भाषा म्हणून भाषांचा समावेश केल्याने विशेषत: शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील. याव्यतिरिक्त, या भाषांमधील प्राचीन ग्रंथांचे जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटायझेशन संग्रहण, अनुवाद, प्रकाशन आणि डिजिटल मीडियामध्ये नोकऱ्या निर्माण करतील.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते.

कॅबिनेटच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट
ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.