मुंबई -झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले.या कार्यक्रमाच्या पहिल्या भागा पासूनच कार्यक्रमात सहभागी १४ लिटिल चॅम्प्सनी आपल्या उत्कृष्ठ सादरीकरणामुळे रसिक प्रेक्षकांना थक्क करून टाकले आहे.त्यामुळे प्रतिभावान लिटिल चॅम्प्स मार्गदर्शन करणारे पंचरत्न यांना देखील या लिटिल चॅम्प्सना जज करणं कठीण जातंय.
येणाऱ्या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्स गुरुपौर्णिमा विशेष भागात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि हा भाग नवीन मंचावर सादर होणार आहे.
या भागाची सुरुवात पंचरत्न आणि सर्व लिटिल चॅम्प्सच्या दमदार परफॉर्मन्सने होणार असून या भागात सर्व लिटिल चॅम्प्स आपल्या गुरूला गाणं समर्पित करणार आहे. या विशेष भागाची सुरुवात पंचरत्न आणि सर्व लिटिल चॅम्प्सच्या दमदार परफॉर्मन्सने होणार आहे.
गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता होणाऱ्या या विशेष भागात कोण मिळवणार वरचा सां? कोणाला मिळणार गोल्डन तिकीट? कोण ठरणार परफॉर्मर ऑफ द वीक? हे पाहणे औस्त्युक्याच ठरणार आहे.