नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ वर्षांखालील जिल्हा संघाची निवड चाचणी

0

नाशिक (प्रतिनिधी) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा होणार असुन त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवार दिनांक २४ जुलै रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे.अशी माहिती असोशिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांनी दिली.

या संघासाठी साठी १ सप्टेंबर २००५( ०१/०९/२००५ )नंतर जन्मलेल्या खेळाडूंचा विचार करण्यातयेईल.तरी इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते ६.३० पर्यंत,चाचणी शुल्कासह आपली नावे नोंदवावीत.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तासाला खेळाडुंची यादिनुसार निवड चाचणी घ्यायची असल्याने शुक्रवार २३ जुलै पर्यंतच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे,ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. संघ निवड चाचणी शुल्क प्रत्येकी पन्नास रुपये आहे.

नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात, स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह २४ जुलै रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी साडेनऊ ( ०९३० ) वाजता हजर रहावे असे आवाहन हि करण्यात आले आहे. .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.