काय आहेत केळीचे आरोग्यास फायदे 

डॉ.राहुल रमेश चौधरी 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
हिरव्यागार पानांची,डौलदार,दिमाखात उभी राहिलेली केळींची झाडे उभी राहीलेली सगळ्यांनी पाहीलेलीच असेल तसेच त्यावर पिवळी धम्मक,सोनेरी वर्णाची केळीचे घड देखील सगळ्यांनी पाहीलेली आहेच.आज आपण सर्वांनाच परिचित अश्या केळी या फळाचे उपयोग पाहणार आहोत. केळी ला गरीबांचे पूर्णान्न म्हटले जाते,तीच केळी श्रीमंत व उच्चभ्रू समाजाचा आरोग्यदायी म्हणून अविभाज्य घटक सुध्दा आहे.कोणी केळे शिकरण म्हणून खातात तर कोणी पोळीसोबत.सगळ्या जागी केळी हजेरी लावते.

सत्यनारायण पूजा काय, प्रसादाचा शिऱ्यात काय किंवा नैवेद्यासाठी किंवा मंगलप्रसंगी प्रवेशद्वार सजवण्यासाठी का होईना केळी आहेच.अशी केली रंभा,भरपूर पाणी असल्याने अम्बुसारा नावाने परिचित.केळीचा उपयोग फळापासून मुळापर्यंत प्रत्येक भाग उपयोगात येतो.कच्ची केळी भाजीसाठी भज्यांसाठी वापरली जातात.केळीचे फूल देखील आहारात वापरले जाते.तसेच केळीच्या दांड्याचे पाणी देखील.

वेलची केळी उत्तम,आरोग्यदायी,गुणकारी.केळीची साधी,तांबडी,वेलची,राजाळी असे प्रकार मिळतात.आजकाल  केळी लवकर पिकवण्याकरीता चुना लावतात.याने केळी आतून कच्ची राहतात पण बाहेरून रंग बदलतो.अश्या अर्ध कच्ची केळ्याने कफ वाढतो.मात्र केळ्यावर पिकून काळे ठिपके दिसून सालीचा रंग सोनेरी पिवळा असल्यास ती खाण्यायोग्य जाणावी.

काय आहेत केळीचे आरोग्यास फायदे 
१.भस्मक नावाच्या आजारात सारखी सारखी भूक लागते अश्या वेळी केळी खाल्ल्याने हा आजार कमी होतो.
२.तीव्र अम्लपिताच्या विकारात घशाशी जळजळ होणॆ,आंबट पाणी घशाशी येणे,या सर्व तक्रारी केळी ने कमी होतात.
३.पोटातील व्रण पित्ताच्या तीव्र अम्लतेने तयार झाल्याने असल्यास केळीच्या मधुरतेने व केळीच्या मांसल भागाने आतील भागाचे संरक्षण होते.
४.लघवी पिवळी होणे,कमी होणे ,लघवीस आग होणे अश्या वेळी केळी खाल्ल्यास या तक्रारी कमी होतात.
५.सारखा सारखा कोरडा खोकला येत असल्यास व छातीत दुखत असल्यास केळी मध व मिरे मिश्रण घ्यावे याने फायदा दिसतो.
६.काहीही कारण नसताना वजन कमी होत असल्यास अशक्तपणा जाणवत असल्यास केळी,खजूर,अंजीर,मध घ्यावे याने पोषण होते,उत्साह वाढतो,वजन वाढते.
७.जुनाट दम्याने त्रास होत असल्यास ,फुफ्फुसे दम्याने अशक्त झाल्यास केळी व लवंग एकत्र खावून मधपाणी प्यावे.याने फुफ्फुसाला बळ मिळते.
वरील सर्व पिकलेल्या केळ्याचे गुणधर्म.
८.सतत जुलाब होत असल्यास कच्ची केळी सुंठ लावून खावी.
९.अंगावर गळू उठल्यास कच्च्या केळ्याची चटणी वाटून गरम करून गळू वर लावून बांधल्यास गळू पिकून जाण्यास मदत होते.
१०.मधुमेहाने रात्रीस वारंवार लघवीस जाण्याचा त्रास असल्यास कच्चे केळे,बेलाच्या पानांचा रस घ्याव याने फायदा होतो.
वरील कच्च्या केळाचे गुणधर्म.
११.लहान मुलांना जंत होत असल्यास केळ फुलाचा रस व वावडींग एकत्र द्यावे.
१२.महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्त्रावात केळफूलाची भाजी खावी.याने आटोक्यात येते.
१३.मधुमेही रुग्णांमध्ये सतत लघवीस होत असल्यास केळीच्या फूलाची भाजी खावी.
१४.केळीच्या फूलात तुरटपणा असल्याने शरीरातील अतिरिक्त पाण्याचे प्रमाण कमी होते.
हे गुणधर्म केळीच्या फुलाचे
१५.लघवीच्या सर्व तक्रारींकरीता केळीच्या दांड्याचे पाणी अति उपयुक्त आहे.
१६.रुग्णास ताप येवून अंगाची लाही लाही होत असल्यास केळीच्या पानावर रुग्णास झोपवून केळीच्या दांड्याचे पाणी पिण्यास द्यावे.
१७.उन्हात फिरल्याने अचानक चक्कर येत्तात.उलट्या होतात,डोळ्यांसमोर काळोख होतो.याने केळीच्या दांड्याचे पाणी दिल्याने आराम होतो.उलट्या थांबतात.
१८.गर्भवती स्त्रीला केळीच्या दांड्याचे पाणी दिल्यास लघवी व शौचास साफ होते.
१९.केळीच्या खांबाची जाळून केलेली राख खोबरेल तेलात मिसळून लावल्यास व्रणास आराम मिळतो.
२०.अम्लपित्तात केळीच्या खांबाची राख घेतल्यास उत्तम लाभ मिळतो.
२१.या  केळीच्या खाबांपासून तयार केलेल्या राखेपासून क्षार मिळतात याने सर्व मूत्रविकार दूर होतात.
२२.केळीच्या पानांचा,मूळांचा उपयोग औषधी निर्माणाकरीता करतात.

निषेध
१.दूध व केळी एकत्र खावू नये.
२.सर्दी,खोकला,अंगावर सूज असल्यास,दमा,ताप असल्यास केळी खावू नये.
३.ज्यांना भूक लागत नाही,तोंडास वारंवार पाणी सुटते अश्यांनी केळी खाणे टाळावे.
४.रात्री केळी खाणे टाळावे.
५.केळी खावून पिताचा त्रास होत असल्यास केळी खावू नये.
६.ताकासह,दह्यासह,दूधासह,ताडगोळ्यासह केळी खावू नये.

औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   
संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.