खजूराचे आरोग्यास फायदे

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
घरोघरी जेव्हा ड्रायफ्रूटचे ताट समोर येते तेव्हा अवश्य खजूराचे नाव अग्रगण्य असते.पौष्टीक असलेले हे फळ,बी-मगज  याबाबतीत देखील उपयुक्त आहे.ताड,खजूर हे एकाच प्रकारचे वृक्ष.त्याची रचना,पाने सारखीच.हे वृक्ष वाढण्याची भूमी देखील सारखीच.याची पाने देखील झाडू ,चटया बनवण्यासाठी वापरले जातात.खजूर फळांचा मगज व बी औषधासाठी वापर केला जातो.

खजूर हा श्रेष्ठ मानला जातो.हाच व्यवहारात विशेषत: उपयोगात आणला जातो.तसेच यात छुहारा हा प्रकार देखील चव व गुणधर्माच्या दृष्टीने उपयुक्त मानला जातो.
भारत व अरबस्तान या ठिकाणी ही फळे प्रामुख्याने उपलब्ध-उत्पन्न होतात.अश्या खजूर या फळाचे उपयोग आज बघूयात,
खजूराचे आरोग्यास फायदे 
१.खजूर फळाचा मगज हा अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे.
२.वजन वाढत नसल्यास अश्या वेळी खजूर योग्य मिश्रण व योग्य पध्दतीने खाल्ल्यास आतड्यांचे शोषण करण्याची शक्ती वाढते व वजन वाढते.
३.खजूर मगज हा मज्जायुक्त अनेक सूक्ष्म धागे व तंतुमय असा पदार्थ आहे.
४.खजूर फळाची मज्जा मांसधातु चे वर्धन करण्यास उपयुक्त आहे.तसेच मांसपेशी शैथिल्यातही उत्तम लाभ मांसधातु मज्जा ने होतो.संधिस्नायुबंधने देखील बळकट होतात.

खजूर बीज
१.खजूर बी चे चूर्ण जाळून त्याची धुरी मूळव्याधीच्या मोडास दिली असता मोड सुकतात.
२.शरीराचा उत्साह कमी झाल्यास खजूर बी चा काढा घ्यावा.
३.खजूराचे बी कुटून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास पिण्यासाठी वापरल्यास अंगातील अतिरिक्त उष्णता कमी होते तसेच जास्त तहान लागणे कमी होते.
४.सतत घामोळे येत असल्यास बी चे पाणी पिणे तसेच बी उगाळून लावावी.
५.उन्हातून सतत फिरणे,मोबाईल,टी.व्ही.,बारीक वस्तूंची कामे करणे यामुळे डोळे लाल होतात,जळजळतात,लाल-गरम होतात यावर उपाय म्हणून खजूर बी उगाळून डोळ्यांच्या खाली लेप लावावा.

विशेष उपयोग
१.खजूरापासून तयार केलेले आसव खर्जूरासव हे भूक वाढवते,वजन वाढवते,तसेच राजयक्ष्मा च्या रुग्णांमध्ये याचा उत्तम उपयोग होतो.याचा संग्रह ताडी प्रमाणे खजूराच्या झाडास खाचे मारून केला जातो.तसेच यापासून गूळ देखील बनवला जातो.
२.दातांच्या समस्येमुळे जर जुलाब व आव असल्यास मधामध्ये खारीक उगाळून द्यावी याने लाभ होतो.
३.लहान मुलांना दात येतेवेळी हिरड्या शिवशिवतात अश्यावेळी खारीक चावण्यास द्यावी याने हिरड्या दात मजबूत होतात.व दातांच्या तक्रारीही कमी होतात.
४.जुने व्रण असल्यास खजूराचे पोटीस बांधून तूप खजूर खावा.मधुमेहातील जखमेत उपयोग होत नाही.
५.खजूर  व मध  एकत्र योग्य प्रमाणात घेतल्यास ह्रद्याची आग,चक्कर येणे,खूप तहान लागणे,भरपूर घाम येणे यात लाभ दिसतो.
६.गरोदर स्त्री ने चवथा ते आठवा महिन्यापर्यत खजूर खाणे,दूध पिणे यावर भर द्यावा याने मांसधातु बलवान होतो.तसेच गर्भिणीस मलावरोधाचा त्रास राहत नाही.प्रसूती सुखकर होते.
७.खजूर व शिंगाडा पीठ तुपात परतून खाल्ल्यास व वर दूध घेतल्यास शरीरातील रक्ताची वाढ होते व शरीर मन प्रसन्न राहते.
८.खजूर,जायफळ,लोणी,वेलची पूड योग्य प्रमाणात घेतल्यास वीर्याचा पातळपणा कमी होवून मैथुनशक्ती वाढीस लागते.व स्त्रीयांना रक्ताच्या कमतरतेने योग्य पाळी येत नसल्यास उपयोग होतो.
९.खजूर हळद एरंडेल याची वाटून चटणी करून मुक्कामार च्या ठिकाणी लावल्यास उपयोग होतो.

निषेध-
१.जुलाब व भूक नसताना खावू नये.

 

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

मोबाईल -९०९६११५९३०

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.