मसूर डाळीचे आरोग्यास फायदे 

डॉ. राहुल रमेश चौधरी  

0

डॉ. राहुल रमेश चौधरी  
मसूर डाळ सर्वांच्याच घरात असेल.मसूर हे द्विदल धान्य असणारे कडधान्य आहे.मसूर दोन प्रकारची असते ,एक पांढरी व एक काळ्या रंगाची.यातील आख्खे मसूर काळ्या रंगाचे असतात.परंतु त्याच्या डाळीचा रंग लाल असतो.मसूराची आमटी ही कोकणाच्या वैशिष्ठयांपैकी  एक आहे.मसूर डाळ ही पचण्यास जड आहे.आहारात मात्र काळे मसूर वापरण्याचा प्रघात आहे.महाराष्ट्र ,पंजाब,उत्तर भारत या प्रांतात मसूर जास्त वापरली जाते.

काय आहेत मासूर डाळीचे आरोग्यास फायदे  
१.मसूर डाळ ही रसाने गोड,हलकी,वातुळ,कोरडी,मलविबध्द करणारी,कफ-पित्त-रक्तपित्त दूर करणारी,शक्तिवर्धक,बल वाढवणारे आहेत.
२.घसा खवखवणे,टॉन्सिल वाढून घसा दुखणे,गिळताना त्रास होणे असे असल्यास लंघन करावे,व मसूर सूप करून त्यात हळद,मोहरी,हिंग याची फोडणी देवून घसा शेकावा याने उत्तम लाभ होतो.
३.जुलाब होत असल्यास मसूराचे कढण प्यावे व लंघन करावे.कढणात जिरे ,बडीशेप,मिरे घातल्यास उत्तम लाभ होतो.जुलाब थांबतात व पोषण होवून अशक्तपणा टिकून राहत नाही.
४.पातळ ,भसरट शौचास होत असल्यास मसूर डाळ ,गव्हाचे फुलके असा आहार ठेवल्यास आतड्यांना बळ मिळते.
५.लघवीस कमी होणे,आग होणे,दुखणे असे असल्यास मसूर डाळीचे कढण त्यात कोथिंबीर ,धणे,साखर ,सैंधव घालून तीन  ते चार वेळा घ्यावे याने तक्रारी कमी होतात.
६.अत्यधिक घाम येण्याची सवय असल्यास मसूर भाजून दळून त्याचे पीठ  व भीमसेनी कापूर हे मिश्रण संपूर्ण शरीराला चोळून नंतर काही वेळाने पुसावे.
७.मसूर च्या पानांची भाजी हलकी असून खाण्यास उत्तम असते.
८.गळू च्या जखमांवर मसूर ची डाळ वाटून लावावी.
९.या डाळीत लोहाचे प्रमाण अत्यधिक असल्याने याचा आहारात मुबलक प्रमाणात वापर करावा.

निषेध 
१.शौचास कठिण होत असल्यास मसूर खावू नये.
२.पचनाच्या तक्रारी असून त्यात वात पकडत असल्यास खावू नये.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी
औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.