पपईचे आरोग्यास फायदे 

डॉ.राहुल रमेश चौधरी 

1

डॉ.राहुल रमेश चौधरी 
पपई हे फळ भरपूर प्रमाणात आढळते.याचे नाव वेगवेगळे मधुकर्कटी,एरंड कर्कटी .पपई चे दूध,फळ,पाने,बी,मूळ हे सर्वच उपयोगात येते.पपई च्या बीयांचा मिऱ्यामध्ये भेसळ करण्यासाठी वापरतात.पपईचे कोशींबीर,हलवा,लोणचे,शिरा,चटणी,भाजी बनवण्याकरीता उपयोग होतो.सिंगापूरी,मधुबिंदू,वॉशिग्ट्न,बडवानी,लोट्ण,बंगलोरी,पुरी,राची,सिलोनी अश्या विविध जातीच्या पपया मिळ्तात.पपईत जीवनसत्वा अ,क भरपूर प्रमाणात आढळते.अशा या पपईचे गुणधर्म बघूयात.

पपईचे गुणधर्म
१.कच्च्या पपईच्या दूधाचे(चीक) चूर्ण बनवून वापरल्यास त्याचा उपयोग पाचक म्हणून होतो.तोंडास सतत पाणी सूटणे,मळमळ होणे,पोट जड होणे,सुस्तावणे या या तक्रारींकरीता पपई दूध चूर्ण उपयोग केला जातो.
२.मार लागल्यास ,पाय मुरगळल्यास कच्च्या पपई चा चिक त्या ठिकाणी लावल्यास वेदना कमी होतात.
३.कच्च्या पपई च्या चीकाचा लेप स्तनांवर लावल्यास बाळंतीनीस दूध सुटते.
४.जंताचा त्रास झाल्यास कच्च्या पपई चा चीक गुळासह द्यावा सोबत एरंडेल तेल,त्रिफला,आरग्वध यासारखे विरेचक-पोट साफ व्हायचे औषध द्यावे.
५.कच्चे फळ हे हाता पायास बांधून ठेवल्यास हातापायांची आग कमी होते,भेगा पडणे कमी होते.
६.मांसाहार करण्याआधी मांस व्यवस्थित शिजण्याकरीता व उत्तम पचण्याकरीता  पपईचे कच्चे फळ तुकडे टाकून शिजवावे.
७.त्वचारोग,खरूज,इसब अथवा नायटा घालवण्याकरीता त्यावर कच्च्या पपई चा चीक लावावा याने त्रास कमी होतो.
८. अन्नाचे पचन बिघडल्यास वा तत्सम कारणांनी यकृत,प्लीहा वाढल्यास कच्ची पपई वाटून त्याचा लेप त्या भागावर बाहेरून लावावा.
९.जेवणानंतर पिकलेली पपई खावी याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
१०.पिकलेली पपई नियमीत खाल्ल्यास जंताचा त्रास कमी होतो.
११.बाळंतीन आईस पपई खायला दिल्यास दूध चांगले येते.
१२.मासिक पाळीचे स्त्राव कमी होणे, न होणे ,मासिक पाळीच्या तक्रारींसाठी पपई खावी व ओटीपोटीवर एरंडेल तेल लावावे.
१३.प्रसूतीनंतर रक्तस्त्राव थांबवण्याकरीता बीयांचा रस काढून द्यावा व ओटीपोटीवर एरंडेल तेल व रस लावावा.
१४.एरंडाच्या पानाच्या चटणीच्या पुरचुंडीने छाती शेकल्यास स्त्रीच्या दूधातील जडपणा कमी होतो,दूधातील गाठी कमी होतात.व चिकटपणा कमी होतो.
१५.पपई च्या वाळलेल्या पानांचे चूर्ण ,मध एकत्र करून घेतल्यास ह्रदया संबधी तक्रारीत लाभ दिसतो.
१६.पपई च्या मुळाचा काढा मूतखडा पाडण्यास उपयुक्त ठरतो.
१७.पिकलेली पपई सोलून त्यातील गर कुस्करून चेहऱ्याला लावल्यास,त्याने मसाज केल्यास व नंतर चेहरा धूवून त्यावर औषधांनी बनवलेले तेल लावल्यास काळे डाग ,वांग,काळसर पणा,सुरकुत्या जातात व चेहरा मुलायम,तजेलदार,सुंदर व तेजस्वी दिसतो.
१८. पपई च्या पानांचा काढा घेतल्यास जीव घाबरणे,नाडीचा वेग वाढणे यात लाभ होतो.
१९.लहान मुलांनी नियमीत पपई खाल्ल्ल्यास उंची वाढते,शरीर बलवान होते.
२०.पपई ही उदर रोग म्हण्जेच (ascites) या आजाराचा नाश करते.
२१.आतड्यांचे दुर्बलता,कमकुवत पचन संस्था सुधारण्यास पपई चे सेवन उपयुक्त ठरते.

सावधान
१.पपई चा वापर गर्भिणी ने करू नये.
२.पिकलेली पपई ही गुणाने थंड असते.
३.कच्च्या पपईच्या सेवनाने मुळव्याध आजारात रक्त पडत असेल तर त्याचे प्रमाण  वाढते.
४.मासिक पाळी च्या वेळी रक्तस्त्राव खूप होत असल्यास पपई खाणे टाळावे.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी
औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Laxman N suryawanshi says

    Excellent information sir

Don`t copy text!