गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – देशा सह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होतांना दिसते आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्ण संख्या २० हजाराच्या खाली आली आहे हि दिलासादायक म्हणावी लागेल. परंतु दुसऱा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे.कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरुच आहे. राज्याजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पाटील यांना एका वर्षात दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनासदृश्य लक्षणं दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते देखील सध्या कोरोनावरील उपचार घेत आहेत.
कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021