इंडिगो विमानाला आकाशात वीज कोसळली –श्रीनगरमध्ये आपत्कालीन लँडिंग

⚡पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO!

2

📍 श्रीनगर | दि. २१ मे २०२५ –IndiGo flight lightning strike  दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2142 मध्ये आकाशात उड्डाण करत असताना विजेचा धक्कादायक प्रकार घडला. खराब हवामानामुळे पायलटने प्रसंगावधान राखून आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानात एकूण 227 प्रवासी होते आणि सर्वजण सुखरूप असल्याची माहिती एअरलाइनने दिली आहे.

💥 काय घडलं नेमकं?
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास श्रीनगरच्या दिशेने जात असताना अचानक वातावरणात गडगडाट झाला, वीज चमकली आणि जोरदार गारपीट सुरु झाली. या थरारक प्रसंगात प्रवाशांची अक्षरशः धडधड वाढली. विमानाच्या नाकाला मोठे नुकसान झाले आणि विमानाला श्रीनगरमध्ये तातडीने उतरवावे लागले.

🛬 पायलटची सतर्कता आणि निर्णय महत्त्वाचा ठरला:(IndiGo flight lightning strike)
वातावरणातील बदल लक्षात घेऊन पायलटने तत्काळ ATC (Air Traffic Control) शी संपर्क साधत इमर्जन्सी लँडिंगची तयारी सुरु केली. काही वेळातच विमान श्रीनगर विमानतळावर यशस्वीरित्या उतरले.

📹 पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO:

🔧 AOG (Aircraft on Ground) घोषीत:
विमानाच्या पुढच्या भागाला नुकसान झाल्याने ते सध्या AOG स्थितीत असून दुरुस्तीसाठी पाठवले गेले आहे. इंडिगोने सर्व प्रवाशांना पुढील प्रवासापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे.

🌧 गोव्याच्या प्रवाशांसाठी सूचना:
इंडिगोने गोव्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हवामान बिघडल्यामुळे उड्डाणात विलंब होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] उद्घाटन झालेल्या अमरावती विमानतळावर सोमवारी एक हास्यास्पद आणि संतापजनक […]

Don`t copy text!