नाशिक – नाशिक तालुक्यातील गिरणारे गावामध्ये मा पंतप्रधान यांचे वाढदिवसानिमित्त covid-19 जम्बो लसीकरण सत्र प्राथमिक आरोग्य केंद्र धोंडेगाव यांचे मार्फत राबविण्यात आले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांचे मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून जम्बो लसीकरण सत्राचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांना कोविशील्ड लस देण्यात आली याप्रसंगी गावातील सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर नाशिक तालुका आरोग्य अधिकारी तथा सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शैलेश निकम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित पाटील ,डॉ सातपुते व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आदिवासीबहुल कार्यक्षेत्र असूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लस घेण्यासाठी गर्दी केली होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण सत्र आयोजनाचे सर्व नियम पाळून स्थानिक सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचे लसीकरण सत्र पूर्ण करण्यात आले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात लसीकरण करण्यात आले प्रथम या क्षेत्रा मध्ये लसीकरणाला विरोध होता आरोग्य विभाग व इतर विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
चित्ररथ व इतर विविध माध्यमांचा वापर करून व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य यांचा सक्रिय सहभाग घेऊन या भागांमध्ये जनजागृती करण्यात आली त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर लसीकरणाला नागरिकांकडून वेग आलेला दिसून येत आहे आता नागरिकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीचे पदाधिकारी आमदार खासदार तसेच आरोग्य विभागात काम करणारे अत्यंत महत्त्वाचे शिलेदार म्हणजे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सहाईका समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक सेविका आशा यांनी यासाठी अत्यंत मेहनत घेतली त्यांना ग्रामपंचायत विभागाची साथ लाभली हे लसीकरण असेच वाढत राहील आणि आपण covid-19 वर नक्कीच मात करणार हे आशादायक चित्र या निमित्ताने दिसून येत आहे