गणेश विसर्जनाकरिता नियमांचे पालन करा – मनपा आयुक्त कैलास जाधव 

0
नाशिक – नाशिक महानगर पालिकेतर्फे यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सव २०२१ साजरा करण्यात येत आहे . तसेच मा. उच्च न्यायालयाने नुकत्याच पीओपी च्या गणेश मूर्तींवर घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने नदीपात्राचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मनपातर्फे नाशिक शहरातील नागरिकांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती घरोघरी व सार्व.ठिकाणी सार्वजनिक मंडळांमार्फत बसविण्याकरिता आवाहन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात विसर्जित न करीता गणेश मूर्ती मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रावर जमा कराव्यात असे आवाहन नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी नागरीकांना केले आहे.
मनपाच्या या आवाहनास शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन पर्यावरण संवर्धनात आपले योगदान दिले .त्याचप्रमाणे गणेश विसर्जन करताना देखील नागरिकांनी पर्यावरण पूरक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा यासाठी नाशिक महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यासाठी गणेश विसर्जनाकरिता नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता त्या मूर्ती मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रावर जमा कराव्यात तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन हे घरच्या घरीच करावे
त्याकरिता अमोनियम बायकार्बोनेट पावडर मनपातर्फे वितरीत करण्यात येत असलेल्या केंद्रांवरून घेण्यात यावी. मा. मनपा आयुक्त श्री. कैलास जाधव यांनी नागरिकांना गणेश विसर्जना करिता शासनाच्या सर्व नियम तसेच कोविड -१९ च्या असलेल्या निर्बंधाचे , कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे .तसेच जे नागरिक वरील नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा यावेळी मनपा आयुक्तांनी दिला .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.