चला हवा येऊ द्या च्या मंचावर खिलाडी अक्षय कुमारचा जबरदस्त परफॉर्मन्स

0

मुंबई झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला  पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे कि मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हे ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आले आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील.

खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्याचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता कि टाळ्या आणि शिट्या थांबायचं नाहीत. हे सर्व कलाकार त्यांचा आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते.

तसेच डॉक्टर निलेश साबळेने सोशल मीडियावर अक्षय कुमारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, ‘आ रही है पुलिस, सुपरस्टार खिलाडी येणार, आपल्या मंचावर दंगा होणार, दिवाळीचा सुपरहिट धमाका. सुर्यवंशी’ची ऍक्शन आणि ‘चला हवा येऊ द्या’ ची कॉमेडी ऍक्शनच्या माध्यमाने पहिल्यांदाच अक्षयकुमार यांचा मराठमोळा अंदाज पहायला मिळणार आहे.

सोशल मीडियावर या विशेष एपिसोडमधील एक सीन देखील शेअर केला आहे. याची झलक पाहून प्रेक्षकांना हसणे आवरणार नाही. हा व्हिडिओ पाहून आपण नक्कीच अंदाज लावू शकतो की, येत्या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आपल्याला धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे.

चला हवा येऊ द्या सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.