दहावीचा निकाल सोमवारी २७ मे रोजी जाहीर होणार 

निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार ?

0

पुणे,दि,२५ मे २०२४ – महाराष्ट्र  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. यातच  दहावीच्या निकाल संदर्भात  बातमी समोर आली आहेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दि २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.राज्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.

बोर्डानं बारावीचा निकाल २१  मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची  वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.सीबीएसईनं काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता. महाराष्ट्रात सीबीएसईच्या तुलनेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं.दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील काही भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येतो. मुंबईसह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते.

निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?

राज्य मंडळाच्या या https://mahahsscboard.in/mr आणि https://sscresult.mkcl.org/ अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.