आजचे राशिभविष्य शनिवार,२५ मे २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख कृष्ण द्वितीया.ग्रीष्म ऋतू, 
राहुकाळ -सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे”  
नक्षत्र: जेष्ठ/मूळ. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृश्चिक / (सकाळी १०.३६ नंतर) धनु. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात संथ आहे. मोठे निर्णय घेऊ नका. दुपार नंतर अनुकूलता वाढेल. व्यसने आणि प्रलोभने टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करून घ्या. संध्याकाळ खर्चात टाकणारी आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मनासारखी होतील. छोटी सहल घडेल. पाण्यापासून सावध रहा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अर्थकारण सावरण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रवासात मात्र काळजी घ्या. जल प्रवास टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस चांगला आहे. वाहतूक व्यवसायातून यश मिळेल. लाभ वाढतील. पत्नीची काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. पूर्वार्ध अधिक चांगला आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नेहमीची कामे चालू ठेवा. नवीन काही सुरुवात आज नको. आरोग्य सांभाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जुनी गुंतवणूक आज कामी येईल. भविष्याचे नियोजन कराल. जुने मित्र आणि सहकारी भेटतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा पूर्वार्ध फारसा अनुकूल नाही. सुरुवात संथ होणार आहे. यथावकाश कामाचा वेग वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पूर्वार्ध अनुकूल आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. उत्तरार्ध चिंता वाढवणारा आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. कामे पूर्ण करवून घ्या. अनपेक्षित लाभ होतील. कलाकारांनी घशाची काळजी घ्यावी.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. कामानिमित्त भ्रमंती घडेल. प्रलोभने टाळणे हिताचे आहे.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.