जनस्थानच्या १० व्या वर्धापन दिनाच्या लोगोचे अनावरण

१६ जून ते २३ जून दरम्यान जनस्थान फेस्टिवलचे आयोजन 

0

नाशिक,दि, २४ जून २०२४ – नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात जनस्थानची भक्कम ओळख आता सर्व दूर निर्माण झाली आहे. २०१४ रोजी स्थापन झालेल्या या ग्रुपचा १० वा वर्धापन दिन १६ जून ते २३ जून या दरम्यान साजरा होणार आहे. त्यानिमित्त कुसुमाग्रज स्मारक या ठिकाणी जनस्थानचे सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी जनस्थानच्या १० व्या वर्धापन दिना निमित्य लोगोचे अनावरण  माजी आमदार व प्रसिद्ध  वकील ॲड. विलास लोणारी यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी नाशिक मधील सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलावंत उपस्थित होते. १० वा वर्धापन दिनानिमित्त १६ जून ते २३ जून या आठ दिवसात विविध कार्यक्रम होणार आहे याची माहिती जनस्थानचे कुटुंबप्रमुख अभय ओझरकर यांनी यावेळी दिली.

जनस्थान नाशिकच्या कलाक्षेत्रातील दिग्गज कलावंताचा व्हाट्सअप ग्रुप आहे. वेगवेगळ्या कलाक्षेत्रातील नामवंत कलावंत या ग्रुप मध्ये आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून कलेचा जागर गेली १० वर्षे सातत्याने सुरू आहे. या ग्रुपचा फेस्टिवल दरवर्षी मोठ्या उत्साहात नाशिकमध्ये साजरा होत असतो. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमा सोबत प्रत्येक वर्षी चार सदस्यांचा  जनस्थान आयकॉन पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कार सह ८ दिवसात जनस्थान महोत्सव साजरा होतो. त्यामध्ये चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन अशा सर्व कलांचा संगम नाशिककरांना अनुभवता येतो. यावर्षी दिनांक १६ ते १९ जून या दिवशी नाशिक मधील दिग्गज चित्रकार, शिल्पकार यांचे कला प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच २० जून ते २३ जून या दिवशी नाशिक मध्ये नाशिककरांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केलेली आहे. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे जनस्थानचा हा १० वा वर्धापन दिन आहे.  १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावर्षी १० वर्षांचा लेखाजोखा आणि सांस्कृतिक नाशिक हा विषय घेऊन एक स्मरणिका जनस्थानच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. तसेच या स्मरणिकेत नाशिकचा सांस्कृतिक इतिहास आणि जनस्थानचा प्रवास या अनुषंगाने अनेक दिग्गजांचे लेख स्मरणिकेत असणार आहेत. जनस्थान ग्रुपच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त १६ जून ते २३ जून या दिवसात नाशिककरांनी या सांस्कृतिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जनस्थान कुटुंबप्रमुख श्री. अभय ओझरकर  तसेच जनस्थानच्या सदस्यांनी केलेले आहे.

यावेळी नाशिक मधील अनेक दिग्गज कलावंत उपस्थित होते. यामध्ये जनस्थान कुटुंबप्रमुख अभय ओझरकर यांच्यासह ज्येष्ठ कलावंत कैलास पाटील, कुसुमाग्रज स्मारकाचे कार्यवाह संगीतकार मकरंद हिंगणे,लोकेश शेवडे  माध्यम तज्ञ नंदन दीक्षित,सावाना पदाधिकारी व ज्येष्ठ दिग्दर्शक सुरेश गायधनी, ज्येष्ठ अभिनेते विजय  साळवे,सी एल कुलकर्णी, महेश आंबेरकर ,संजय पुणतांबेकर,नृत्यगुरु कीर्ती भवाळकर ,अभिनेता किरण भालेराव, प्रकाशयोजनाकार विनोद राठोड,अतुल भालेराव ,श्रीया जोशी ,फणींद्र मंडलिक ,प्रसाद राहणे ,गणेश शिंदे,राजा पाटेकर ,अभिनेत्री नुपूर सावजी,सुप्रसिद्ध बासरी वादक मोहन उपासनी, ज्येष्ठ साहित्यिक राजू  देसले, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा केतकर, प्रसिद्ध चित्रकार अतुल  भालेराव, प्रसिद्ध सुलेखनकार निलेश गायधनी,सुहास भोसले नाट्य कलावंत प्रवीण कांबळे,महारुद्र अष्टुरकर,अभिनेत्री नुपूर सावजी,पल्लवी कदम,पल्लवी जन्नावार ,पूर्वा सावजी, समीर तोरसकर,दिगंबर काकड, इतर कलावंत उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.