माणुसकीच्या नात्यांचा अनोखा उपक्रम “औषधांच्या पलीकडले”
नाशिककरांसाठी २० जुलैला अनोखा उपक्रम :कमीत कमी औषधं आणि उत्तम जीवनशैलीचा आग्रह
नाशिक ,दि,१६ जुलै २०२४ –आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाची जीवनशैली बिघडत चालली आहे. स्पर्धेच्या युगात ताण-तणावाचे जीवन भोगलं जात आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि अकालीच अनेक आजारांना कवटाळत अनेक जण डॉक्टरचे आणि पर्यायाचे हॉस्पिटलचे मोठमोठ्या रकमेचे बिल भरत आहेत. परंतू याच कलियुगात नाशिकमध्ये चार अनुभवी आणि ज्येष्ठ डॉक्टर्स आहेत जे आपली रोजची प्रॅक्टिस करताना रुग्णाला कमीत कमी औषधे घ्यायला भाग पाडतात इतकेच नाही तर रोजच्या जीवनात आरोग्यासाठी आहार, विहार आणि व्यायाम कसा उपयोगी पडेल याचं मार्गदर्शन देखील करतात.याच गोष्टीचा विचार करून डॉक्टर विनिता देशपांडे यांनी एक अनोखी कल्पना मांडली प्रत्येक रुग्णाला आणि नातेवाईकांना वेगवेगळे सांगताना चौघा डॉक्टर्सनी एकत्र येऊन हे विचार नाशिककरांसमोर मांडायचे ठरवले आणि एकूणच प्रत्येकाची जीवनशैली ही कशी सुधारेल, प्रत्येकजण आरोग्यदायी कसा राहिल आणि स्वतःच्या आरोग्याकडे स्वतः लक्ष देऊन स्वतःच कसे नियंत्रण ठेवेल अशा गोष्टी समोर मांडायच्या ठरवल्या आणि अशा आशयाचे अनोखे चर्चासत्र करायचे ठरले. या चर्चासत्राचे नाव आहे डॉक्टर्स ऑन ड्युटी..औषधांच्या पलीकडले
या चर्चासत्रामध्ये सहभागी होणारे डॉक्टर्स आहेत डॉक्टर विजय घाटगे जे सिनियर जनरल फिजिशियन आहेत, सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नितीन घैसास, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर चंद्रकांत संकलेचा आणि उत्तम जीवनशैलीच्या मार्गदर्शक डॉक्टर विनिता देशपांडे हे चारही प्रतिष्ठित अनुभवी डॉक्टर्स नाशिककरांना आरोग्याची गुरुकिल्ली देणार आहेत. हे चर्चासत्र येत्या शनिवारी 20 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे.
या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ जाहिरात तज्ज्ञ नंदन दीक्षित या चारही डॉक्टर्सची मुलाखत घेणार आहेत तर सूत्रसंचालन पियू आरोळे करतील. सदर चर्चासत्र हे विनामूल्य असून यासाठी मोफत पासेसची व्यवस्था डॉक्टर विजय घाटगे यांच्या शरणपूर रोड येथील क्लिनिकमध्ये, डॉक्टर नितीन घैसास आयटीआय जवळच्या हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर चंद्रकांत संकलेचा यांच्या गोविंद नगर येथील हॉस्पिटल मध्ये आणि डॉक्टर विनिता देशपांडे यांच्या कॉलेज रोड येथील क्लिनिकमध्ये केली जाणार आहे. (पासेस नसतील तरी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे)
या कार्यक्रमाला श्री.दीपक चंदे,श्री.गिरीश टकले, सन फार्मा,श्री राजन दातार, डॉ. प्रीती बजाज, श्री ज्ञानेश्वर महाजन, श्री. यश राय यांचे सहकार्य लाभले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केली आहे