कुंटणखान्यातील निर्मलाची विदारक जीवनव्यथा “कायाचक्र”

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा -प्रवीण यशवंत 

0

समिज्ञा बहुुद्देशिय संस्था यांनी “कायाचक्र” हे नाटक स्पर्धेत सादर केले.(मूळ कथा लेखक व नाट्यरूपांतर लेखक यांचे नाटकातील गोष्टीच्या अनुषंगाने पार्श्वभूमी)

नाटकाच्या विषयावर पुढे जाण्या अगोदर या नाटकाची मूळ कथा लिहलेले लेखक समीर गायकवाड हे गेली तीस वर्ष प्रॉस्टिट्युशन मध्ये असलेल्या स्त्रियांविषयी लिखाण करताय कथा,नाटक,१५ वर्षापूर्वी त्यांचे “गजरा” हे नाटक नाशिकच्या स्पर्धेत सादर होते होते. “खुलुस” ही त्यांची प्रसिद्ध कांदबरी.समीर गायकवाड  यांच्या कथेवरील वरील “कायाचक्र” या सत्य घटनेचे मूळ उत्तरप्रदेशातील  नटपूर्व या अतिशय दुर्गम गावातील ५० ते ७० च्या दहशकातील आहे.तिथे प्रत्येक घरात वेश्याव्यवसाय चालतो… आणि  चालत आला आहे त्या काळातील  संस्थानिकांनाही  त्याला जबाबदार आहे. १९७० ते १९९५ च्या काळात, निर्मला आणि  मेहेर ही त्याच गावातील, या दोघी १६ व २० वर्षांच्या युवती  तेथील भीषण  परिस्थिती,व्यवस्थेतून पळ काढता दहा तासाच्या प्रवास करून लखनौ ला पोहचता तिथून मुंबईत ते थेट वेश्याव्यवसायत.

हे सर्व कशासाठी,एका मुलीला,स्त्रीला वाटणाऱ्या सुव्यवस्थित इतरांसारखे आयुष्य जगण्यासाठी. ही समीर गायकवाड यांच्या कथेतील सत्य घटनेवर आधारीत गोष्ट.
याचे नाट्य रूपांतर समीर तोरस्कर आणि  मृणाल पाटील यांनी केलय. समीर तोरस्कर हे मुंबईत लॅमेंटेन रोडला एका बँकेत सर्व्हिस करत असता त्यांच्या FD निमित्त त्यांचा संपर्क आला त्या स्त्रियांकडे डॉकेमेंट्स पूर्ण नसायचे अशा अनेक कारणाने त्या स्त्रियांच निरीक्षण करत होते,बघत होते,स्वताहून काही गोष्टी समजून घेत होते त्यातून त्यांची जी अस्वस्थता आणि आवस्था झाली त्या सर्व भीषण भावभावनांचा निचरा म्हणजे  “कायाचक्र” हे नाटक.

Maharashtra State Drama Competition/Nirmala's heartbreaking life in Kuntankhana "Kayachakra"

नाटक निर्मला ची गोष्ट सांगते तिच्या झालेल्या अवस्थेचा प्रवास  वेश्या व्यवसायात तिला मिळालेलं जगण, तिचे गिऱ्हाईक चांगले,वाईट माणसं यांचं अतिशय भीषण,भेदक करुणामय रित्या नाटकातून आपल्या समोर येते. आपण अनेक नाटक,सिनेमा,कथा,कादंबरीतून हे,एकलय,बघितलंय,वाचलंय पण निर्मलाची गोष्ट रंगमंचार छाप पाडते करण ती सत्य घडलीय ह्या पॉईंट ऑफ व्हूने  बघताना तिच्या संपूर्ण करुणामय यातानामय प्रवासाची प्रतिकृती आपल्या समोर येते, ती भावते,ते उत्तम कलावंताच्या माध्यमातून.नाटकात वेश्या व्यवसायिकांचे विश्व,त्याच राहण,जगण,त्यांच वाटन,त्यांच्या समाजाप्रती त्यांच्या अपेक्षा,या नाटकाच्या सादरीकरणातून निर्मलाच्या प्रवासात दिसता अस्वस्थता निर्माण करता प्रामाणिक, प्रभावि सादरीकरण झाले “कायाचक्र” नाटकाचे.

दिग्दर्शक समीर तोरस्कर नाटक माध्यमातून विषयाप्रती त्यांची भावना व्यक्त करता नाटकाची ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचावी इथे दिग्दर्शकाची  संवेदनशीलता प्रामुख्याने जाणवते.विषयानुरूप त्यांनी दिग्दर्शन केलंय.सर्व तंत्रज्ञानी त्यांना साथ दिलीय.

संगीत संयोजन गीता शिंपी यांनी केलंय नाटकासाठी निवडलेले पिसेस विषयानुरूप होते आणि त्यांचे ऑपरेटिंग उत्तम होते फेड आउट,कट,साऊंडची लेव्हल उत्तम परिणाम साधत होते.
प्रकाश योजना विनोद राठोड यांनी केली नाटकातील १९७० ते १९९५ हा काळ,स्थळ,याच प्रकाश योजनेने उत्तम दृश्य साकारलं आहे.

नेपथ्य विक्रम गावांदे यांनी केलंय कुठलाही लावाजमा गोळा ना करता ३ बाय ६ उभ्या फ्रेम वापरून नाटकातील स्थळ उभे केलंय व प्रकाश योजनेने ते परिपूर्ण केलंय उत्तम नेपथ्य.

वेशभूषा अंकिता मुसळे यांनी विषयानुरूप केलीय.
रंगभूषा प्रीती उमराळकर,पूजा बेलोकर यांनी केलीय.

Maharashtra State Drama Competition/Nirmala's heartbreaking life in Kuntankhana "Kayachakra"

निर्मलाची भूमिका केलीय पल्लवी ओढेकर यांनी पात्राच्या आयुष्यात घडलेल्या घटना,प्रसंग त्याचे तपशील त्यांनी समजून उमजून त्यांनी हि भूमिका साकारलीय.निर्मला या स्त्रीच पात्र साकारताना एक स्त्री अभिनेत्री म्हणून त्यांची पात्रातील इन्व्होलमेंट त्याच्या अभिनयातून दिसत होती नाटकातील करुणाय प्रसंगात त्यांच्या आवाजाची कंपण,स्पंदन,उद्रेकावस्थेत शब्दातील व्हायब्रेशन असंख्य निर्मला जिवंत करत होत्या.मोठ्या लेन्थचा हा रोल फार उत्तम सादर केलाय पल्लवी ओढेकर यांनी हि नाटकाची जमेची बाजू

तरुण निर्मला,गुलाबो यांचा रोल हर्षाली भोसले यांनी साकारलाय
समीर गाडे व असिफ यांचा रोल केलाय विक्रम गावांदे यांनी विषयानुरूप अभिनय करण्याचा उत्तम प्रयत्न.
जेलर कोठ्यावरील महिला यांचे रोल केलेय मयुरी शुक्ल यांनी कॉन्स्टेबल ची भूमिका केलीय प्रिया पाटोळे यांनी.

कलावंत
प्रशांत देशपांडे,मानवी शिंदे,स्वरा जाधव,आशा हरिश्चंद्र ,मीना जाधव,वृषाली बच्छाव ,सुजित हरिश्चंद्र,खुशाल जगताप,रविराज वरखेडे,
चेहेरे -नुपूर ठाकूर,गायत्री पांढरपठ्ठे,विधी गांगुर्डे,मृणाल पाटील.कोरिओग्राफर – नुपूर ठाकूर,ऐश्वर्या पवार.रंगमंच सहाय्य -सोहम तोरस्कर,अद्वित काळे.

प्रवीण यशवंत 
मोबाईल – ७७६७८९४४३५

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.