Mumbai Fire:आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

व्हिडीओ पहा

0

Pallavi Patil
पल्लवी पाटील (अभिनेत्री )आजचा रंग – नारंगी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

मुंबई,दि,६ ऑक्टोबर २०२४ –आज पहाटे मुंबई मध्ये भीषण दुर्घटना घडली सून उपनगरातील चेंबूर परिसरात पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली.एका चाळीतील दुमजली घराला लागलेल्या या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

चेंबूर मधील सिद्धार्थ नगर परिसरात रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली. येथील चाळीत अनेक दुमजली घरे आहेत.यापैकी एका घराला अचानक आग लागली.या घरातील कुटुंबीयांना वेळीच आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील ७ जणांचा झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला.यामध्ये सात वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या सगळ्यांना अग्निशमन दलाने घरातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर ही आग घरात पसरत गेली. गुप्ता कुटुंबीय झोपेत असल्याने त्यांना आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आगीत होरपळून मृत्यू मुखी पडले. पारिस गुप्ता (वय ७), मंजू प्रेम गुप्ता (वय ३०), अनिता प्रेम गुप्ता (वय ३९), प्रेम गुप्ता (वय ३०), नरेंद्र गुप्ता (वय १०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली.आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या, स्थानिक पोलीस पोहचले.सध्या ही आग विझवण्यात आलेली आहे.आगीतील जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषीत करण्यात आले.आज रविवार असल्याने गुप्ता कुंटुंब हे रात्री जेवण करुन गाढ झोपले होते.पहाटे साखरझोपेत असताना अचानक घराला आग लागली. ही आग इतकी भयानक होती,की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला. त्यामुळे काही कळण्याच्या आतच गुप्ता कुटुंबाच क्षणार्धात होत्याच नव्हतं झाले.

आग लागली तो सिद्धार्थ कॉलनीचा परिसर हा गायकवाड मार्गाजवळ आहे.हा झोपडपट्टीचा परिसर आहे.या परिसरात अनेक वन प्लस वन आहेत.गुप्ता कुटुंबाची वन प्लस वन झोपडी होती. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Shubhangi sadavarte
शुभांगी सदावर्ते (अभिनेत्री)उद्याचा रंग – पांढरा
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.