सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ७ हजार ८२४ ऍक्टिव्ह रुग्ण
नाशिक शहरासह निफाड ,दिंडोरी, सिन्नर मध्ये सर्वाधिक रुग्ण
नाशिक – नाशिक जिल्ह्यात अनेक दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे १९२५ रुग्ण आढळले असून त्यापैकी शहरात १३६८ नवे रुग्ण वाढल्याने नाशिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी मकरसंक्रांती पार्श्वभूमीवर नागरीकांनी गोदावरी नदीवर अंघोळीसाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी करून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र बघायला मिळाले.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ८ हजार १७८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ७ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १५७, बागलाण ३४, चांदवड १९, देवळा १६, दिंडोरी २४३, इगतपुरी ४६, कळवण ४०, मालेगाव २०, नांदगाव ६४, निफाड ४६८, पेठ ०४, सिन्नर ११०, सुरगाणा १३, त्र्यंबकेश्वर २५, येवला २५ असे एकूण १ हजार २८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ८८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३८ तर जिल्ह्याबाहेरील ३१४ रुग्ण असून असे एकूण ७ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २४ हजार ७६८ रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १०४, बागलाण १२, चांदवड १४, देवळा ०६, दिंडोरी ७०, इगतपुरी २३, कळवण ०७, मालेगाव ०६, नांदगाव २२, निफाड ७९, पेठ ०३, सिन्नर ४०, सुरगाणा ०९, त्र्यंबकेश्वर १४, येवला १९ असे एकूण ४२८ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.५५ टक्के, नाशिक शहरात ९५.८० टक्के, मालेगाव मध्ये ९६.१५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.०९ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २५२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
४ लाख २४ हजार ७६८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ८ हजार १७८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७ हजार ८२४ पॉझिटिव्ह रुग्ण. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.०९ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)