Nashik : चर्चमध्ये स्वतःला जाळून घेत फादरने केला आत्महत्येचा प्रयत्न

0

नाशिक(प्रतिनिधी) – ख्रिसमसचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानच नाशिक मधील शालिमार येथील सेंट थॉमस चर्च येथे महाधर्मगुरु शरद गायकवाड यांच्या समोर फादर अनंत आपटे यांनी आत्महत्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. फादर अनंत आपटे यांनी चर्चमध्येच पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले आहे. या घटनेमुळे चर्चच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमिटीने बाजू मांडू न दिल्याने फादर आपटे हे प्रचंड मानसिक तणावा खाली होते. चर्च कमिटीने फादर यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.. यातूनच आपटे यांनी शालिमार येथील सेंट थॉमस चर्च येथे महाधर्मगुरु शरद गायकवाड यांच्यासमोरच आत्महत्याचा प्रयत्न केला.

रविवारची उपासना चालू असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी आपटे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत ते १८ टक्के भाजल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी आता पुढे काय होणार, पोलिस काय दखल घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.