ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ? सुपर मॉडेल समितीचा इशारा 

0

नवी दिल्ली – ओमायक्रॉन व्हेरिएंट आता जगभरात हाहाकार माजवत आहे.दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगभराची चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटची भीषणता ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक आहे.सध्या भारतात दररोज ८ हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. मात्र लवकरचं ही संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.अशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातही एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.असा इशारा Covid19 सुपर मॉडेल समितीने दिला आहे. त्यामुळे फेबुवारी २०२२ पर्यंत भारतात ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते, मात्र ही रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असेल असाही अंदाज या समितीने व्यक्त केला आहे.

सध्या देशातील १२ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे जवळपास १४३ रुग्ण आहेत. यावर माहिती देताना Covid सुपर मॉडेल समितीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले की, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत असल्याने ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य वाटेल, मात्र तिसरी लाट नक्कीच येईल. सध्या देशात दररोज सुमारे ७,५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. मात्र जेव्हा डेल्टा प्रकार प्रभावीपणे ओमायक्रॉनने बदलला जाईल तेव्हा ही संख्या वाढेल. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा वेगाने पसरत आहे.यावर विद्यासागर म्हणाले की, भारतात अद्याप बऱ्याच जणांना डेल्टा व्हेरीएंटचा धोका जाणवला नाही. त्यामुळे येणारी तिसरी लाटही धोकादायक ठरणार नाही, मात्र देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.

सेरो सर्वेक्षणावर बोलताना विद्यासागर म्हणाले की, ८५ टक्के प्रौढांना लसींचा पहिला डोस मिळाला आहे, तर ५५ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेतील दैनंदिन प्रकरणे दुसऱ्या लाटेसारखी दिसणार नाहीत. मात्र देशात तिसरी लाट आली तर दररोज किमान २ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. मात्र हा केवळ अंदाज आहे ही रुग्णसंख्या कमी जास्त असू शकते असे हि ते म्हणाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.