बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नीथा शेट्टीची वाईल्ड कार्ड एंट्री :आविष्कार दारव्हेकर घरा बाहेर !

0

मुंबई आपण सगळेच दर आठवड्यात वाट बघत असतो ती म्हणजे बिग बॉसची चावडी कधी भरणार याची. या आठवड्यात कोणकोणत्या सदस्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब लागणार ? हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे होते. महेश मांजरेकर या चावडीवर सदस्यांना ते कुठे चुकले हे सांगतात याचसोबत कोणता सदस्य चांगला खेळला हे देखील सांगतात. कानउघडणी करतात, कौतुकाची थाप देतात, त्यांना सल्ले देतात. या आठवड्यात बिग बॉसच्या चावडीवर विशाल निकमची महेश मांजरेकरांनी शाळा घेतली. त्याचे टास्क दरम्यान वागणे भीषण दिसले असे त्यांनी सांगत त्याला खडेबोल सुनावले तर मीनलला सल्ला दिला. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे सोनाली, मीरा, गायत्री आणि जयला दाखविण्यात आली. तर दादूस आणि तृप्तीताईंनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

बिग बॉसच्या घरामध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. आविष्कार, स्नेहा, सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आहेत असे महेश मांजरेकरांनी सांगितले. आता या चार जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. आविष्कार दारव्हेकरला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

तर घरामध्ये झाली दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री…नीथा शेट्टी – साळवी. बघूया आता हिच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ? कोणत्या गृपमध्ये जाणार ? की ती स्वतंत्र तिचा खेळ खेळणार ?

कसा असणार नवा सदस्यासोबतचा नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोम ते रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.