ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
अश्विन, कृष्ण, एकादशी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस, *वसुबारस, रमा एकादशी* आहे.” आज सवत्स गायीचे पूजन करावे.
चंद्र नक्षत्र – पूर्वा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक कामे वाढतील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. पराक्रम गाजवाल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मौल्यवान खरेदीचे बेत आखाल. वाहन सुख लाभेल. मातेकडून लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. लेखनातून यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाकारांना उत्तम दिवस आहे. वक्तृत्व बहरेल. कुटुंबात वेळ द्यावा लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढीस लागेल. अडचणी दूर होतील. आप्त भेटतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. एखादी सुखावणारी घटना घडेल. संध्याकाळ आनंदाची.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) आयुष्यात रंग भरणारा दिवस आहे. सुखाची अनुभूती येईल. उत्साह वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाची जबाबदारी वाढेल. सहकारी चांगले सहकार्य करतील. प्रगती होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) प्रवासाचे बेत आखाल. शिक्षणाशी संबंधित कामे मार्गी अलगत. अचानक धनलाभ संभवतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यसने आणि प्रलोभने टाळा. गुंतवणूक करताना जोखीम उचलू नका. उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम सुख लाभेल. भिन्न लिंगी व्यक्तींकडून लाभ होतील. प्रेमात यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक फायदा होईल. व्यवसायात प्रगती होईल. आनंदी राहाल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)