नेपाळ पुन्हा एकदा शक्‍तीशाली भूकंपाने हादरले : १२८ जणांचा मृत्यू

दिल्ली - एनसीआरसह उत्तर भारताला जाणवले धक्के नेपाळमध्ये केंद्र तर ६.४ रिश्टर स्केलची भूकंपाची तीव्रता ,:भूकंप वारंवार का होतात ? भारतात सर्वात मोठा धोका कुठे !

0

नवी दिल्ली,दि,४ नोहेंबर २०२३ – नेपाळ पुन्हा एकदा ६.४ रिश्टर स्केलचा शक्‍तीशाली भूकंप झाला असून या भूकंपामुळे दिल्ली – एनसीआर सह भारतातील अनेक राज्ये हादरली आहेत शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्‍या या भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत १२८ जणांचा मृत्‍यू झाला आहे.तर अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबल्‍याने गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारांसाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील अयोध्येपासून सुमारे २२७ किमी उत्तरेस आणि काठमांडूच्या ३३१ किमी पश्चिम उत्तर-पश्चिमेस १० किमी खोलीवर होता.या भूकंपाचे धक्‍के देशातील इतर राज्‍यातही बसले. यामध्ये दिल्‍ली, उत्‍तर प्रदेश, बिहार, उत्‍तराखंडमध्येही भूकंपाचे धक्‍के बसले आहेत.

गुरुग्रामचे रहिवासी इंद्रजीत सिंग म्हणाले, “आम्ही टीव्ही पाहत असताना आम्हाला बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले.” गाझियाबादचे रहिवासी गोपाल यांनी सांगितले की,१५ सेकंदांपेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवले.ते  म्हणाले , “मी खिडकीच्या काचेचा खडखडाट ऐकला.

नेपाळमध्ये महिनाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक बाहेर आले.

नोएडा सेक्टर-७६ मधील ग्रुप हाऊसिंग सोसायटीत राहणारा प्रत्युष सिंह म्हणाले , “खरोखरच जोरदार हादरे जाणवले. ही खूप भीतीदायक भावना होती. ” उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

काय आहेत भूकंपाची करणे 
जेव्हा टेक्टोनिक प्लेट्सची स्थिती बदलते. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरतात आणि दरवर्षी ४ ते ५ मिमीने त्यांच्या ठिकाणाहून सरकतात. अशा स्थितीत एक प्लेट दुसऱ्यापासून दूर जाते आणि दुसरी प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकते. या प्रक्रियेदरम्यान, प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.